सुप्रसिद्ध रॅपर आणि गायक आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया उर्फ बादशाह याने संगीत क्षेत्रात अल्पावधीतच मोठे नाव कमावले आहे. त्याने बॉलिवूड आणि पंजाबी सिनेमांमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत. तो त्याच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल नेहनमीच चर्चेत असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती तो शेअर करत नाही. पण पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यावर आता तो पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे.
आणखी वाचा : रणवीर सिंगने मुंबईच्या रस्त्यावर दाखवली त्याच्या ऍस्टन मार्टिन गाडीची झलक, किंमत वाचून व्हाल थक्क
अलीकडेच बादशाह ‘फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्हज’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. तसेच करण जोहरशी बोलताना बादशाहने तो सिंगल असल्याचं म्हटलं होतं. पण आता वेगळ्याच बातम्या येऊ लागल्या आहेत. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यावर आता बादशाह पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. ‘पिंकविला’च्या रिपोर्ट्सनुसार, दोघांची भेट कॉमन मित्राच्या एका पार्टीत झाली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि आता दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.
बादशाह आणि ईशा रिखी यांनी त्यांच्या नात्याबद्दल कुटुंबीयांना सांगितले आहे आणि सर्वजण त्यांच्या निर्णयावर खुश असल्याचेही समोर येत आहे. मात्र, दोघांनाही त्यांच्या नात्याबाबत कोणताही निर्णय घाईगडबडीत घ्यायचा नाही.
हेही वाचा : ‘सिंग इज किंग’, मिकाने खरेदी केले खासगी बेट आणि…
बादशाहचं आधी लग्न झालं आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे जस्मिन. मात्र त्यांच्यात झालेल्या काही वादानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. बादशाहची पत्नी जस्मिन आता वेगळी राहते. २०१९ मध्ये दोघामध्ये वाद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या दोघांना एक मुलगीही आहे. आता जस्मिन आपल्या मुलीसोबत लंडनमध्ये राहते. तर बादशाह दिल्ली, मुंबई आणि चंदीगडमध्ये राहतो.