Sohail Khan Viral Video : अभिनेता सलमान खान व अरबाज खान यांचा धाकटा भाऊ सोहेल खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हिडीओ व्हायरल होत आहे. अरबाज खानची दुसरी पत्नी शुरा खान लवकरच आई होणार आहे. तिचा बेबी शॉवर कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमातील सोहेल खानच्या व्हिडीओने लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत.
अरबाज खान आणि शुरा खान यांच्या घरी लवकरच चिमुकल्या सदस्याचं आगमन होणार आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी हे दोघेही त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. नुकताच शुरा खानचा बेबी शॉवर कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये अनेक बॉलीवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. संपूर्ण खान कुटुंब या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. अरबाजचा धाकटा भाऊ सोहेल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होता. तो कारमधून उतरल्यावर धाडकन दरवाज्याला धडकला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, सोहेल खान त्याच्या गाडीतून उतरतो आणि पापाराझींकडे पाहू नहात हलवतो. त्यावेळी गाडीचा दरवाजा उघडा आहे, त्याला लक्षात आलं नाही. तो हात हलवत मागे वळतो तेव्हा तो कारच्या दरवाजाला धडकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ-
सोहेल खानचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘मोठ्या लोकांबरोबर असंही घडतं’, ‘कमी प्यायला असता तर दरवाजा दिसला असता’, ‘आता कोणी म्हणणार नाही की तो दारू प्यायला आहे,’ ‘अभिनव कश्यपचा शाप लागला,’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी लक्ष नसलं की अशा गोष्टी सर्वांबरोबरच घडतात, असं म्हटलंय.
दरम्यान, सोहेल खान आता अभिनेता म्हणून फारसं काम करत नाही. तो त्याचा बिझनेस आणि प्रॉडक्शन हाऊसच्या जबाबदाऱ्या सांभाळतोय. तसेच तो अनेक बॉलीवूड इव्हेंट्सना हजेरी लावतो. तिथले त्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात. सीमा सचदेवपासून घटस्फोट घेतल्यावर सोहेल बरेचदा दोन्ही मुलांबरोबर वेळ घालवताना दिसतो.