भारतातील सध्याच्या काळातील लोकप्रिय गायकांची यादी काढायची म्हंटली तर सोनू निगमचं नाव ही सर्वात अग्रस्थानी घ्यावं लागेल. ८० आणि ९० च्या दशकात सोनूने एकहाती बॉलिवूडवर आणि संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आजही सोनू त्याच्या लाईव्ह शोजमधून चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. सोनूने हिंदीसह इतरही भाषांमध्ये भरपूर गाणी म्हंटली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सोनू पार्श्वगायन फारसं करत नाही, यामागे नेमकं कारण काय याबद्दल सोनूने भाष्य केलं आहे. ‘झुम एंटरटेंमेंट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनूने यावर वक्तव्य केलं आहे. अभिनेते हे गायकांसाठी उभे राहत नाही असा आरोप सोनूने केला आहे आणि यविषयी बोलताना त्याने शाहरुख खानचाही उल्लेख केला आहे.

आणखी वाचा : इस्रायल-पॅलेस्टाइन पार्श्वभूमीवर शाहरुख खानचं ‘ते’ जुनं ट्वीट होतंय व्हायरल; नेटकरी म्हणाले “गद्दार…”

एकेकाळी शाहरुखसाठी कित्येक हीट गाणी देणारा सोनू आज शाहरुखसाठी का गाऊ शकत नाही याबद्दल सोनू म्हणाला, “अभिनेते हे गायकांच्या बाजूने उभे राहतात किंवा त्यांच्यासाठी मध्यस्थी करतात ही गोष्ट होताना दिसत नाही. जर असं घडलं असतं तर मी आजही शाहरुख खानला आवाज दिला असता. अभिनेत्यांना वाटतं की या गोष्टीट दिग्दर्शक किंवा संगीत दिग्दर्शकाने लक्ष घालावं. अभिनेते फारफार त्यांना काही उत्तम पर्याय देतात पण त्यापलीकडे जाऊन त्या गायकासाठी अडून राहणं ही त्यांना जमत नाही. ते आमच्यासाठी झगडत नाहीत.”

नुकतंच ‘रेड एफएम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनूने रेहमानच्या एका गाण्यावरही टीका केली आहे. मुलाखतीत सोनू म्हणाला, “चिगी विगी हे खूप वाईट गाणं आहे. मला हे गाणं अजिबात आवडत नाही. रेहमान यांनी इतकं वाईट गाणं का बनवलं हे मला कळत नाही. कधी कधी रेहमानकडूनही चुका होऊ शकतात. पण मला ते गाणं अजिबात आवडत नाही. गाणं अजून चांगलं होऊ शकलं असतं.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu nigam says actors like shahrukh khan dont fight for singers avn