Rashmika Mandana Speaks Marathi : सोशल मीडियामुळे कलाकार मंडळी अगदी रोज चाहत्यांच्या संपर्कात राहू शकतात. सोशल मीडियाद्वारे कलाकारांना चाहत्यांबरोबर त्यांच्याविषयीच्या अपडेट्स शेअर करायला आवडतं, तर चाहतेही आपल्या आवडत्या कलाकाराविषयी जाणून घेण्यासाठी कायमच उत्सुक असतात. अशीच चाहत्यांच्या संपर्कात राहणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना.

दक्षिण सिनेसृष्टीसह बॉलीवूड इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयामुळे कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. बॉलीवूडसह हिंदी सिनेसृष्टीत काम केल्यानं अभिनेत्रीचा साऊथ आणि हिंदीतही बराच मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या अभिनयानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या रश्मिकाचा क्युट अंदाजही अनेकांच्या पसंतीस पडतो. अशातच रश्मिकानं मराठी बोलतानाचा एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे.

रश्मिकानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांच्या सेग्मेंटमध्ये तिला चाहत्यांना काही प्रश्न विचारले. त्यात एका चाहत्याने रश्मिकाला मराठीत बोलण्याची विनंती केली आणि रश्मिकानंही चाहत्याच्या या विनंतीला मान देत मराठी भाषेत संवाद साधला. रश्मिकानं तिच्या मराठी भाषेत बोलल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

अभिनेत्रीला एका चाहत्यानं, “तुम्ही थोडी मराठी भाषा बोलू शकण्याचा प्रयत्न कराल का,” असा प्रश्न विचारला आणि या प्रश्नाला उत्तर देत रश्मिका तिच्या क्युट अंदाजात मराठीत “तुम्ही कसे आहात? मला आशा आहे की, तुम्ही सगळे चांगले आहात.” दरम्यान, या इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांच्या सेग्मेंटमध्ये चाहत्यांनी तिला अनेकदा विविध भाषा बोलण्याची विनंती केली आणि रश्मिकानंही या सगळ्यांची आर्जवं पूर्ण केली आहेत.

https://images.loksattaimg.com/2025/11/rashmika-mandana-speaks-in-marathi.mp4

त्यामुळे चाहत्याने मराठी भाषा बोलण्यास सांगितल्यानंतर तिनं “तुम्ही कसे आहात? आशा आहे तुम्ही सगळे चांगले आहेत” हे म्हटलं आणि पुढे लगेच हे स्पष्ट केलं की, कुठली तरी इतर भाषा बोलण्याचा हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. त्यानंतर तुम्ही मला कृपया कोणती भाषा बोलायला सांगू नका”, असंही मजेशीर अंदाजात म्हटलं. रश्मिकाच्या या प्रश्नोत्तरांच्या सेग्मेंटमध्ये तिला अनेकांनी तिच्या आगामी प्रोजेक्ट ‘गर्लफ्रेंड’बद्दलही विचारणा केली.

रश्मिकाच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, आयुष्मान खुरानाबरोबरचा ‘थामा’ सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात आयुष्मान अन् रश्मिकासह परेश रावल, नवाजुद्दीन सिद्दीकी यांसारख्या कलाकारांच्या दमदार अभिनयामुळेही ‘थामा’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.