Sunita Ahuja Talks About Saiyaara Fame Ahaan Panday : लोकप्रिय अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा अलीकडेच त्यांच्या घटस्फोटांबद्दलच्या अफवांमुळे चर्चेत आली. अशातच आता त्यांनी तिच्या मुलाच्या बॉलीवूडमधील पदार्पणाबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व सुपरहिट ठरलेल्या ‘सैयारा’फेम अहान पांडेबद्दल वक्तव्य केलं आहे.
सुनीता यांनी ‘इट ट्रॅव्हल रिपीट’ला (Eat Travel Repeat) दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी रविना टंडनच्या लेकीबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. सुनीता यावेळी मुलाबद्दल बोलताना म्हणाल्या, “त्याच्या एका चाहत्याने “यशवर्धन इतका छान दिसतो. ‘सैयारा’मध्ये तोच असायला हवा होता. असं म्हटलेलं. मी म्हटलेलं मला आवडलं असतं असं झालं असतं तर; पण माझा मुलगा याहीपेक्षा चांगला चित्रपट करतोय.”
‘सैयारा’ फेम अहान पांडेबद्दल सुनीता आहुजा यांचं वक्तव्य
‘सैयारा’बद्दल सुनीता म्हणाल्या, “मी हा चित्रपट अजून पाहिलेला नाहीये पण यशने दोन वेळा तो पाहिला आहे. आता तो कदाचित नेटफ्लिक्सवर येत आहे ना? सर्व नवोदित कलाकरांना खूप खूप शुभेच्छा. मला सगळ्या मुलांनी खूप मोठं व्हावं, नाव कमवावं, असं वाटतं. मीपण ‘सैयारा’ बघणार आहे; पण आता तो कदाचित नेटफ्लिक्सवर येत आहे.”
काही दिवसांपूर्वी गोविंदाचा मुलगा हर्षवर्धन व रविनाची मुलगी राशा यांचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये दोघे ‘अखियों से गोली मारे’ गाण्यावर डान्स करताना दिसत होते त्याबद्दल सुनीता यांना मुलाखतीत विचारण्यात आलेलं. त्या म्हणाल्या, “ती यशची मैत्रीण आहे. मी तिला आजपर्यंत भेटली नाहीये; पण रविनानं मला तिच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहायला सांगितला होता; पण मी तेव्हा जयपूरला होते. त्यामुळे मला येता आला नाही. पण, मी चित्रपटगृहात तो चित्रपट पाहिला आणि मला तो आवडला.”
दरम्यान, ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार गोविंदा यांचा मुलगा हर्षवर्धन आहुजा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक साई राजेश यांच्या २०२३ साली आलेल्या ‘बेबी’ चित्रपटाच्या रिमेकमधून तो चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.