अभिनेता सनी देओलचा मुलगा करण याच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. करण देओल १८ जून रोजी त्याची गर्लफ्रेण्ड द्रिशा आचार्यबरोबर विवाहबंधनात अडकला. कुटुंबीय आणि काही मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थित करण-द्रिशाचा शाही विवाहसोहळा पार पडला. देओल कुटुंबाने नववधूचे थाटामाटात स्वागत केले. सनी देओलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सून द्रिशाचे स्वागत केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनी देओलने त्याच्या इन्स्टाग्रामवर मुलगा करण आणि द्रिशाच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने एक कॅप्शनही दिले आहे ज्याद्वारे त्याने आपल्या सुनेचे वर्णन मुलगी म्हणून केले आहे आणि या जोडप्याचे अभिनंदनही केले आहे. सनीने लिहिले “आज मला एक सुंदर मुलगी मिळाली आहे. देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो.”

दुसरीकडे, करण देओलचा काका बॉबी देओलही नववधूच्या आगमनाने खूश आहे. बॉबीने त्याच्या इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तो करण आणि द्रिशाबरोबर आहे. या फोटोत तो, पत्नी तान्या देओल आणि मुलगाही दिसत आहे. दुसऱ्या छायाचित्रातही बॉबी देओल आणि त्याची पत्नी या जोडप्याबरोबर पोज देताना दिसत आहेत.

सनी देओलचा मुलगा करण देओलने चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात द्रिशा आचार्यशी लग्न केले आहे. या दोघांनी मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये आर्य समाजाच्या रीतिरिवाजांसह लग्नगाठ बांधली. या हॉटेलमध्ये दोघांचे ग्रँड वेडिंग रिसेप्शनही आयोजित करण्यात आले होते. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol and bobby deol share post for daughter in law welcome drisha acharya in family dpj