‘गदर २’ हा चित्रपट यावर्षीच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. २ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एवढा बहुचर्चित चित्रपट असूनही या चित्रपटाचं बजेट हे १०० कोटी इतकंच असून यासाठी भारतीय सैन्याने प्रचंड मदत केल्याचा खुलासा दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला आहे. उत्तरप्रदेशचं सरकार आणि भारतीय सैन्याने केलेल्या मदतीमुळे आर्थिक भार कुणावरच आला नाही असंही अनिल शर्मा यांनी स्पष्ट केलं. आता नुकतंच सनी देओलच्या मानधनाबद्दल आणि एकूणच चित्रपटसृष्टीतील कारभाराबद्दल अनिल शर्मा यांनी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : ‘डॉन ३’चा फर्स्ट लूक समोर, रणवीर सिंह दिसणार मुख्य भूमिकेत; नेटकरी म्हणाले, “शाहरुख…”

‘लेहेरन रेट्रो’शी संवाद साधताना अनिल शर्मा म्हणाले, “गदर २ साठी ७५ ते १०० कोटी हे पुरेसं बजेट होतं. आम्ही खरंच हा चित्रपट उत्तम व्हावा यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. आज कित्येक अभिनेते १५० आणि २०० कोटी इतके मानधन घेतात ज्यामुळे चित्रपटाचं बजेट हे ६०० कोटीपर्यंत वाढतं, पण यावेळी सनी देओलनेही त्याच्या मानधनात बरीच कपात केलेली आहे.”

याबरोबरच सैन्याने आणि उत्तरप्रदेश सरकारने केलेल्या मदतीबद्दल अनिल शर्मा म्हणाले, “चित्रपट निर्मितीवर आम्ही जास्त लक्ष दिलं आणि आम्हाला भारतीत सैन्यानेही भरपूर मदत केली. आम्ही उत्तर प्रदेशात चित्रीकरण केलं आणि तिथल्या राजकीय नेत्यांनीही खूप मदत केली. महाराष्ट्र सरकारनेही असं पाऊल उचलायला हवं असं मला वाटतं.” ‘गदर २’ हा ११ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol compromised on his fees for gadar 2 says director anil sharma avn