बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमवत आहे. त्याच्या चित्रपटक्षेत्रातील पदार्पणामुळे तो चर्चेत आहेच, पण आता खासगी आयुष्यामुळेही तो चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच करणने प्रसिद्ध आणि दिवंगत फिल्ममेकर बिमल रॉय यांची पणती द्रिशाशी साखरपुडा केला. आता करण आणि द्रिशा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दोघांच्या लग्नाची संभाव्य तारीखही जाहीर झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “मी तुझ्या चुका…”; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पत्नी आलियाने नवाजुद्दीनची मागितली माफी, म्हणाली, “तुझ्यावरचे सगळे…”

कुटुंबातील एका जवळच्या सदस्याने ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, करण आणि द्रिशा १६ जून ते १८ जूनदरम्यान मुंबईत लग्न करणार आहेत. दोघेही जवळपास ६ वर्षे एकमेकांना डेट करत होते. द्रिशा आणि तिच्या कुटुंबाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडत नाही, त्यामुळे या लग्नाची चर्चा न करण्याचा देओल कुटुंबाने निर्णय घेतला आहे. द्रिशा चित्रपटात काम करत नसली तरी ती चित्रपटसृष्टीतील कुटुंबाचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. द्रिशा प्रसिद्ध चित्रपटनिर्माते बिमल रॉय यांची पणती आहे. द्रिशा ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- कंगना राणौत करण जोहरशी सतत का भांडते? खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली, “तो काही लोकांना…”

करणने ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. लवकरच तो अनिल शर्माच्या ‘अपने २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याचे आजोबा धर्मेंद्र, काका बॉबी देओल आणि वडील सनी देओलही दिसणार आहेत. देओलांच्या या तीन पिढ्यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol son karan deol and drisha acharya wedding date revealed