अभिनेत्री सनी लिओनी ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. काय दिवसांपूर्वीच ती पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर झळकली होती. तिची प्रमुख भूमिका असलेला अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘कॅनेडी’ चित्रपटाचं या फिल्म फेस्टिवलमध्ये भरपूर कौतुक झालं होतं. मात्र, सनी लिओनीला हे नाव कसं पडलं याबाबत खुद्द अभिनेत्रीने खुलासा केला आहे.

हेही वाचा- “बरेच फिल्ममेकर्स त्यांच्या…” बॉलिवूडच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल निर्माते रॉनी स्क्रूवाला यांचं मोठं विधान

सनीचा जन्म कॅनडामध्ये भारतीय शीख कुटुंबात झाला. तिचे मूळ नाव करनजीत कौर वोहरा आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी लिओनीने आपलं नाव कसे निवडलं याबाबत सांगितलं आहे.

सनी म्हणाली, “मी अमेरिकेत होते आणि एका मासिकासाठी मुलाखत देत होते. त्यांनी मला मुलाखतीत विचारले तुला तुझं काय नाव ठेवायचं आहे? तेव्हा मी मी टॅक्स आणि रिटायरमेंट फर्ममध्ये काम करत होते. तसेच मी रिसेप्शनिस्टही होते. मला लवकर कामावर जायचे होते. म्हणून मी त्याला गडबडीत सनी नाव सांगितले आणि म्हणाले, अडनाव तुला हवं ते घे.”

हेही वाचा- कडाक्याची थंडी, ४७ रिटेक अन्…, करिश्मा कपूरने सांगितला ‘त्या’ Kiss चा किस्सा

ती पुढे म्हणाली, ‘सनी हे माझ्या भावाचे टोपण नाव आहे. संदीप सिंग असे त्याचे पूर्ण नाव आहे. त्याला आम्ही सनी म्हणतो. मी माझे नाव सनी ठेवल्याचा माझ्या आईला तिरस्कार वाटत होता. ती चिडली आणि म्हणालेली ‘सगळ्या नावांपैकी हेच नाव तुम्ही निवडलंय?’ मी म्हणाले हो, माझ्या मनात तेच आले. मग एका मासिकाने आडनाव निवडले आणि मी ते तसेच ठेवले.