Sushmita Sen Networth : सुष्मिता सेन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांत काम करत तिच्या अभिनय कौशल्याने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयाचा कोणताही वारसा नसताना तिने स्वबळावर इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
सुष्मिता सेनने वयाच्या अवघ्या विशीतच दोन मुलींना दत्तक घेतलं. तिने तिच्या दोन्ही मुलींचा एकटीने सांभाळ केला. अभिनेत्री अनेकदा तिच्या लेकींबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. सुष्मिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. पण, तुम्हाला माहीत आहे का मिस युनिवर्स असलेल्या सुष्मिता सेनची नेटवर्थ किती आहे?
सुष्मिता सेनची नेटवर्थ
GQच्या वृत्तानुसार सुष्मिता सेनची नेटवर्थ जवळपास १०० कोटी रुपये इतकी आहे. ती अभिनयाबरोबर ब्रँड इंडोर्समेंटमधूनही पैसे कमावते. सुष्मिताचं मुंबईत आलिशान घरही आहे. या व्यतिरिक्त तिची मुंबईत इतर ठिकाणीही प्रॉपर्टी आहे. यासह तिच्या भारताबाहेरही काही प्रॉपर्टीज आहेत. सुष्मिता ब्रँडची जाहिरात करण्यासाठी ६० लाख रुपये इतकं मानधन घेते.
सुष्मिता सेनचं दुबईत एक दागिन्यांचं दुकानही आहे. या व्यतिरिक्त तिची कंपन तंत्रा एंटरटेनमेंट ही निर्मिती संस्थाही आहे. सुष्मिताची सेसाजियोनी नावाची अजून एक कंपनी आहे. ही कंपनी स्पा सेंटर आणि हॉटेलशी संबंधित काम करते. सुष्मिताकडे या व्यतिरिक्त महागड्या गाड्यांचं कलेक्शनही आहे.
सुष्मिताकडे आहे महागड्या गाड्यांचं कलेक्शन
सुष्मिताला लक्झरी गाड्यांची खूप आवड आहे. तिच्या गाड्यांच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडे मर्सडीज, AMG GLE53, BMW 7, लेक्सस LX 470, BMWX6, ऑडी Q7 आणि Fiat Linea यांसारख्या गाड्या आहेत.
सुष्मिता सध्या तिच्या रेने आणि अलिषा या दोन मुलींचं संगोपन करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. ती या दोघींबरोबरचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती ‘आर्या’ वेब सीरिजमधून झळकलेली. याचे दोन सीझन आले आहेत. यानंतर ती ‘ताली’ वेब सीरिजमध्ये झळकली. सुष्मिता बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि ती तिच्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत असते. सुष्मिताचा चाहतावर्गही खूप मोठा आहे.
