टर्कीत गेले दोन दिवस भूकंपाचे हादरे बसत आहेत. सोमवारी (६ फेब्रुवारी) तीन भूकंपांनंतर मंगळवारी पुन्हा दोन भूंकप झाले. एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे टर्कीत हाहाकार उडाला आहे. या भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली असून शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. दरम्यान, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टर्कीतील भूकंपामुळे बॉलिवूड कलाकारही हळहळले आहेत. अभिनेत्री आलिया भट्टने टर्कीतील भूकंपाबाबत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये टर्कीतील भूकंपाचा फोटो शेअर करत तिने “हृदय पिळवटून टाकणारी घटना” असं म्हटलं आहे. आलियासह इतर सेलिब्रिटींनीही याबाबत सोशल मीडियाद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा>> Video : भूकंपाच्या हाहाकारात आशेचा किरण! टर्कीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रानेही याबाबत स्टोरी शेअर केली आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्माने टर्कीतील नागरिकांसाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे.

करीना कपूर खानने टर्कीतील भूकंपग्रस्त भागाचा फोटो शेअर करत इमोजी पोस्ट केले आहेत.

हेही वाचा>> Video: तुर्कीत दोन दिवसात पाच हादरे; आतापर्यंत काय घडलं?

टर्कीच्या पूर्व भागासह लगतच्या सीरियातही भूकंपाचे धक्के बसले आहेत. टर्कीतील भूकंपबळींची संख्या आठ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जगभरातील देशांनी येथे बचावकार्यासाठी पथके पाठवली. टर्कीतील आपत्कालीन बचाव पथकांचे २४ हजार ४०० हून अधिक कर्मचारी शोध व बचाव मोहिमेत सहभागी झाले आहेत.टर्कीतील बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkey earthquake bollywood celebrities alia bhatt kareena kapoor anushka sharma react kak