क्रिकेटपटू ऋषभ पंतमुळे सातत्याने चर्चेत असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला आता वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. उर्वशीने पाकिस्तानी क्रिकेटपटूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उर्वशीने दिलेल्या शुभेच्छांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर नेटकरी उर्वशीच्या शुभेच्छा मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली-मुंबईत घरं अन् आलिशान गाड्या; वयाने लहान फहाद अहमदशी लग्न करणाऱ्या स्वरा भास्करची एकूण संपत्ती किती?

पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाहचा १५ फेब्रुवारीला वाढदिवस होता. त्याने त्याचा २०वा वाढदिवस क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या सहकाऱ्यांबरोबर केक कापून साजरा केला. नसीमने पाकिस्तानी क्रिकेटर शादाब खानच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली, त्यावेळी उर्वशी रौतेलाने कमेंट सेक्शनमध्ये त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बलुचिस्तान पोलिसांकडून मानद डीएसपी पद मिळाल्याबद्दल अभिनेत्रीने नसीमचे अभिनंदन केले.

“बाकी सर्व औपचारिकता…” स्वरा भास्कर-फहाद अहमदसाठी कंगना रणौतचं ट्वीट

उर्वशीने ट्विटरवर पाकिस्तानी क्रिकेटपटूचे अभिनंदन केले आणि लिहिलं, “वाढदिवसाच्या शुभेच्छा नसीम शाह. डीएसपी पद मिळाल्याबद्दल अभिनंदन.” त्याचवेळी नसीमनेही उर्वशीच्या कमेंटला ‘धन्यवाद’ लिहून उत्तर दिलं.

उर्वशी रौतेलाने यापूर्वी नसीम शाहबरोबर एक इन्स्टाग्राम स्टोरीही पोस्ट केली होती. उर्वशी आशिया कप २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायला गेली होती. सामन्यानंतर, तिने स्वतःचा आणि नसीम शाहचा एक एडिटेड व्हिडीओ ऑनलाइन शेअर केला होता. मात्र, ट्रोल झाल्यानंतर तिने हा व्हिडीओ डिलीट केला होता. यानंतर नसीमला उर्वशीबद्दल विचारले असता, त्याने “मला ती अभिनेत्री कोण आहे हे माहित नाही आणि लोक असे व्हिडीओ का बनवतात हे देखील माहित नाही. सध्या माझे लक्ष क्रिकेटवर आहे,” असं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urvashi rautela wishes pakistani cricketer naseem shah on his birthday photo viral hrc