Vijayta Pandit says Rajendra Kumar destroyed her career: ज्येष्ठ अभिनेत्री विजयता पंडित या लोकप्रिय अभिनेत्री सुलक्षणा पंडित आणि म्युझिक कंपोजर जतिन आणि ललित यांच्या बहीण आहेत. त्यांनी आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्द इतक्या कमी काळाची का होती, यावर वक्तव्य केले आहे.
विजयता पंडित यांनी नुकतीच विकी लालवाणीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी दिवंगत अभिनेते राजेंद्र कुमार यांच्यावर आरोप केला. त्यांनी करिअर उद्धवस्त केले, असे वक्तव्य त्यांनी केले. अभिनेत्री नेमकं काय म्हणाल्या, हे जाणून घेऊ…
विजयता यांनी १९८१ ला प्रदर्शित झालेल्या लव्ह स्टोरी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. लव्ह स्टोरी चित्रपटात त्यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत कुमार गौरव होते. एकाच चित्रपटात काम करताना हे कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडले.
हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. कुमार गौरव आणि विजयता पंडित हे एका रात्रीत स्टार झाले. मात्र, हे स्टारडम जास्त काळ टिकले नाही. या चित्रपटानंतर गौरव यांनी संजय दत्त यांच्याबरोबर नाम चित्रपटात काम केले. हा चित्रपटदेखील लोकप्रिय ठरला. विजयता यांची सीन चित्रपटातून काढण्यात आला. त्यांची खऱ्या आयुष्यातील प्रेम कहाणीदेखील अशीच काहीशी होती.
“मी त्यांच्यावर प्रेम…”
विजयंता यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की त्यांनी लग्नासाठी अनेक वर्षे कुमार गौरव यांची वाट पाहिली. विजयंता यांना अनेक वर्षा वाट पाहायला लावून कुमार गौरव यांनी संजय दत्तची बहीण नम्रताबरोबर लग्न केले. विशेष म्हणजे याबद्दल कुमार गौरव यांनी विजयंता यांना कोणतीही कल्पना दिली नाही. असा निर्णय घेण्यास राजेंद्र कुमार आणि त्यांच्या कुटुंबाने भाग पाडले असे विजयंता यांनी आरोप केला.
विजयंता म्हणाल्या, “कुमार गौरव माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझे आयुष्यात दु:ख आले. त्यानंतर माझे संपूर्ण करिअर संपले. त्यांच्या वडिलांनी मला त्यांच्याबरोबर काम करू दिले नाही. मी अपंगासारखी झाले होते. मी त्यांच्यावर प्रेम केले. कुमार गौरव यांनी पहिल्यांदा त्यांचे माझ्यावर प्रेम आहे असे सांगितले होते.
“माझी आई धक्क्याने बेशुद्ध…”
“पण, त्यानंतर मला समजले की ते दुसऱ्याच मुलीशी लग्न करत आहेत. माझी अवस्था काय झाली असेल, विचार करा. त्यांनी मला एकदाही याची कल्पना दिली नाही की त्यांची व नम्रताच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. कुमार गौरव यांच्या वागण्याचा मलाच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबालासुद्धा धक्का बसला होता. माझी आई धक्क्याने बेशुद्ध पडली होती. ते असं काही करतील असे कोणालाही वाटले नव्हते. कारण- ते दररोज मला भेटायला घरी येत असत.”
जेव्हा मला त्यांच्या लग्नाबद्दल समजले तेव्हा मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या घरच्यांनी मला त्यांच्याशी बोलू दिले नाही. राजेंद्र कुमार हे आमच्या प्रेमाविरुद्ध होते. जेव्हा लव्हस्टोरी चित्रपट हिट ठरला त्यावेळी त्यांना वाटले की हा चित्रपट केवळ त्यांच्या मुलामुळे हिट झाला आहे. सत्य मात्र ते नव्हते. कुमार गौरव यांच्या लग्नापर्यंत मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्याशी माझे बोलणे झाले नाही. त्यांच्या लग्नानंतर त्यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न मी थांबवले.”
“मला वाटत नाही की कुमार गौरव यांना फारसा त्रास झाला असेल. आम्ही दोघेही प्रेमात होतो आणि त्याचे कुटुंब त्याच्या विरोधात होते. त्यांना कुमार गौरव यांचे लक्ष माझ्यापासून दुसरीकडे वळवायचे होते. त्यांची एक बहीण नम्रता दत्तबरोबर अभ्यास करायची. ती नम्रताला घरी आणायची. ते एकत्र यावेत यासाठी कुटुंबाने दबाव आणला. शेवटी त्याचे लग्न झाले.”
तिने राजेंद्र कुमारवर निर्मात्यांना धमकावण्याचा आणि चित्रपटांमधून काढून टाकण्याचा आरोपही केला, ज्यामुळे विजयता यांनी चित्रपटसृष्टी सोडावी लागली. त्या म्हणाल्या, “कुमार गौरवबरोबरच्या प्रत्येक चित्रपटात मला कास्ट करण्यात येत होते. पण राजेंद्र कुमार यांनी निर्मात्यांना सांगितले की आधी विजयताला चित्रपटातून काढून टाका. मगच कुमार गौरव चित्रपटात काम करेल. त्यामुळे मला अनेक चित्रपटातून काढून टाकण्यात आले. हे सर्व ऐकल्यानंतर मी दुखावले गेले होते. त्यानंतर मी काम न करण्याचा निर्णय घेतला होता.
