Anushka Sharma Virat Kohli Alibaug Villa Price: अनुष्का शर्मा व विराट कोहली देशातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहेत. अलीकडच्या काळात अनेक सेलिब्रिटी मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये फार्म हाऊस खरेदी करत आहेत. अलिबागमध्ये शाहरुख खान, गौरी खान, दीपिका पादुकोण व रणवीर सिंहसह अनुष्का शर्मा व विराट कोहली यांचंही ‘हॉलिडे होम’ आहे. त्यांचं घर खूपच आलिशान असून सर्व आधुनिक सोई-सुविधांनी सज्ज आहे. त्यांच्या घरात पर्सनल पूल व जकूझीदेखील आहे.
विराट व अनुष्का अनेकदा मुंबईहून अलिबागला फेरीने जाताना दिसतात. दोघेही त्यांचं आयुष्य खूप खासगी ठेवतात. दोघांचंही अलिबागमध्ये खूप सुंदर घर आहे. आर्किटेक्चरल डायजेस्टनुसार, अनुष्का- विराटचे हे घर फिलिप फौचे यांची लोकप्रिय आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चर फर्म स्टीफन अँटोनी ओल्मेस्डाहल ट्रुएन आर्किटेक्ट्सने (SAOTA डिझाइन केले आहे. त्यांचे आलिशना घर १०,००० चौरस फूट क्षेत्रफळावर बांधलेले आहे. हे सुंदर घर प्राचीन दगड, इटालियन मार्बल, रॉ ट्रॅव्हर्टाइन आणि तुर्की लाइम स्टोन वापरून बांधले आहे.
या घरात चार बेडरूम आणि चार बाथरूम आहेत. अनुष्का आणि विराटच्या सुंदर घरात उंच छत, संपूर्ण मजल्यावर लाकडी काम केलंय. आणि एक ओपन डिझाइन आहे. नैसर्गिक प्रकाश आत यावा याचा विचार करून घर डिझाईन केले आहे. एडीशी बोलताना आणि घरात फेरफटका मारताना कोहली म्हणालेला, “सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या घरातील दुहेरी उंचीची कट-आउट छत आहे, कारण त्यामुळे नैसर्गिक प्रकाश आत येऊ देते. जितका जास्त प्रकाश… तितकी चांगली ऊर्जा.”
विराटच्या या आलिशान घरात तापमान नियंत्रित करता येईल असा स्विमिंग पूल, स्वयंपाकघर, जकूझी, एक मोठी बाग, इनडोअर पार्किंग, स्टाफ क्वार्टर आणि इतर बऱ्याच सुविधा आहेत. या घरात टेक्नॉलॉजीचा वापरही करण्यात आला आहे. बऱ्याच सुविधा अॅपद्वारे वापरता येतात. सर्केडियन लाइटिंग, गॅस लीक डिटेक्टर आणि हवा आणि पाणी फिल्टरेशनचा यात समावेश आहे.
या व्हिलामध्ये एक स्विमिंग पूल आहे. तसेच आजूबाजूला अनेक झाडं लावलेली आहेत. तसेच त्यांच्या बागेत एक सुंदर डायनिंग एरिया आहे.
विराट कोहली-अनुष्का शर्माच्या अलिबागच्या घराची किंमत किती?
विराट कोहली-अनुष्का शर्माचं हे घर ८ एकरात पसरलेलं आहे. त्यांनी २०२२ मध्ये हे घर १९ कोटी रुपयांमध्ये विकत गेतले होते. या घराची किंमत आता जवळपास ३२ कोटी रुपये आहे.