विशाल भारद्वाज यांची अलीकडेच ‘चार्ली चोप्रा’ नावाची वेब सीरिज प्रदर्शित झाली. त्यानंतर काहीच दिवसांत नेटफ्लिक्सवर त्यांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला. ‘खुफिया’ या विशाल भारद्वाज चित्रपटात तब्बू, वामिका गब्बी, अली फजल, अजमेरी हक आणि आशिष विद्यार्थी या कलाकारांची महत्त्वाची भूमिका होती. चित्रपट काही फारसा चालला नाही, परंतु विशाल यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक झालं. विशाल भारद्वाज आणि शेक्सपीयर हे समीकरण अगदी ‘ओमकारा’, ‘मकबुल’पासून ‘हैदर’पर्यंत अनुभवलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेक्सपिअरच्या लोकप्रिय नाटकांवर बेतलेले हे चित्रपट चांगलेच गाजले. त्यापैकीच शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’वर बेतलेला ‘मकबुल’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटाने विशाल भारद्वाज यांना ओळख मिळवून तर दिलीच याबरोबरच इरफानसारखा ताकदीचा नटही लोकांना याच चित्रपटामुळे परिचित झाला. या जबरदस्त गाजलेल्या चित्रपटातून मात्र विशाल भारद्वाज यांना आजतागयात एक रुपयाही मिळालेला नाही. नुकताच त्यांनी या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीदरम्यान केला.

चित्रपटाच्या शूटिंगसाठी एक खास वाडा लागणार होता आणि त्यासाठी बाहेरच्या शहरात म्हणजेच भोपाळला जाऊन शूटिंग करायचं ठरलं होतं, परंतु आयत्यावेळी सहनिर्माते बॉबी बेदी. यातून काढता पाय घेतला पण भोपाळमध्ये जाऊन शूट करण्यास पैसे नसल्याचं कारण विशाल यांना दिलं. ‘मिड-डे’शी संवाद साधताना विशाल म्हणाले, “एके दिवशी बॉबी मला येऊन म्हणाले की भोपाळमध्ये जाऊन शूटिंग करणं त्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने फिल्म डिव्हिजनच्याच एखाद्या हवेलीमध्ये शूटिंग करा. त्यावेळी त्यांना मी बोललो की मी हे शूटिंग करणार नाही, तर त्यावर ते मला म्हणाले की ते हा चित्रपट करणार नाही. अन् त्यानंतर मी ५ ते ६ पेग पिऊन फोन बंद करून ठेवला.”

आणखी वाचा : अखेर दोन महिन्यांनी समोर आलं मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचं कारण, हॉट टबमध्ये बुडून नव्हे तर…

जवळपास विशाल यांचा फोन आठवडाभर बंद होता. तेव्हा बॉबी यांची टीम विशाल यांना भेटायला आली. त्याबद्दल विशाल म्हणाले, “संगीत, दिग्दर्शन, लेखन या सगळ्याचं मिळून माझं मानधन होतं ३० लाख अन् भोपाळमध्ये शूटिंग करण्यासाठी आणखी ६० लाख आवश्यक होते. त्यावेळी ते म्हणाले की ३० लाख तू दे अन् ३० लाख मी देतो. मी त्यावेळी त्यांना गंमतीत म्हणालो, की ही गोष्ट त्यांनी त्यादिवशीच सांगायला हवी होती.”

पुढे विशाल म्हणाले, “मला आजवरत्या चित्रपटासाठी एक रुपयाचंही मानधन मिळालेलं नाही. मी निर्माता असूनही मला त्यातून कसलाही आर्थिक फायदा झालेला नाही. पण मला त्या ३० लाख रुपयांपेक्षा बऱ्याच काही गोष्टी ‘मकबुल’ने दिल्या आहेत ज्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही.” विशाल यांना ‘मकबुल’साठी पैसे काही मिळाले नाहीत, पण भारतीय चित्रपट इतिहासातील उत्कृष्ट दिग्दर्शकांच्या यादीत विशाल भारद्वाज हे नाव घेतले जाऊ लागले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishal bhardwaj did not get a single penny till today for his masterpiece maqbool avn