‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी करू शकला नाही. चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले आहेत, पण अद्याप १० कोटींची कमाईदेखील केलेली नाही. विवेक अग्निहोत्रींचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल, असे अंदाज वर्तवले जात होते. पण चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. याबद्दल विवेक अग्निहोत्रींनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“वेडा आहेस का?” नाना पाटेकरांना चित्रपटात न घेण्याचा विवेक अग्निहोत्रींना मिळालेला सल्ला; नाना म्हणाले, “माझ्या गावात…”

‘कोइमोई’ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्रींना चित्रपटाच्या निराशाजनक कमाईच्या आकड्यांबद्दल आणि चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी आपण बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत स्वत:ला स्पर्धक म्हणून पाहत नाही असं ते म्हणाले. तसेच आपल्याला आधीचा हिट चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’सारखं यश मिळवायचं असतं तर आपण ‘द काश्मीर फाइल्स २’ ची निर्मिती केली असती, असं म्हटलं.

सोमवारच्या सुट्टीचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ला फायदा नाहीच! १० कोटींपासून बराच दूर आहे चित्रपट, वाचा एकूण आकडेवारी

आपला मुद्दा मांडण्यासाठी विवेक यांनी एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, “समजा की नवीन बुकशॉप फक्त दोन पुस्तकं विकण्याचा निर्णय घेते. पहिलं भगवद्गीता आणि दुसरं प्लेबॉय. प्लेबॉयच्या १००० प्रती विकल्या गेल्या आणि भगवद्गीतेच्या फक्त १० प्रतीच विकल्या गेल्या. तर तुम्ही भगवद्गीतेला फ्लॉप म्हणणार का?” असं ते म्हणाले.

दरम्यान, विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये करोनाच्या लसीच्या निर्मितीची गोष्ट सांगण्यात आली आहे. या चित्रपटात नाना पाटेकर डॉ. बलराम भार्गव यांच्या भूमिकेत आहेत. तर, पल्लवी जोशी, रायमा सेन, गिरीजा ओक यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek agnihotri compared bhagavad gita with playboy after the vaccine war failed hrc