बॉलीवूड अभिनेता सनी देओलच्या ‘गदर २’ या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.सध्या बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. तिसरा आठवडा संपण्यापूर्वीच याने जवळपास ४७० कोटींची कमाई केली आहे. संपूर्ण देशभरात या चित्रपटाची चर्चा आहे. इतकंच नव्हे तर याचे दिग्दर्शक अनिल शर्मा हे हा चित्रपट ऑस्करसाठीही पाठवण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनी देओलसुद्धा या चित्रपटाचं यश साजरं करण्याच्या निमित्ताने प्रत्येक माध्यमाशी संवाद साधत आहे. नुकतंच सनीने यूट्यूबर ‘द रणवीर शो’च्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली अन् ‘गदर २’च्या यशाबद्दल अन् एकूणच आपल्या फिल्मी करकीर्दीबद्दल भाष्य केलं. याबरोबरच आपल्या खासगी आयुष्यातील काही मजेदार किस्सेसुद्धा सनीने सांगितले. एका मुलीची छेड काढल्याने तिचा भाऊ सनीच्या घरापर्यंत येऊन पोहोचल्याचाही खुलासा त्याने या मुलाखतीमध्ये केला.

आणखी वाचा : ‘गदर २’ रचणार इतिहास; सलमान आणि आमिरच्या नावे असलेला ‘हा’ रेकॉर्ड सनी देओल लवकरच मोडणार

याविषयी सनी देओल म्हणाला, “त्यावेळी आम्ही मित्रांबरोबर रस्त्यावर आमच्या गाडीतून फिरत होतो. त्यावेळी समोर एक सुंदर मुलगी आम्हाला दिसली आणि कदाचित मी काहीतरी विचित्र बोललो असेन. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की तिचा भाऊ आमच्या गाडीचा पाठलाग करत आमच्या घरापर्यंत पोहोचला आहे. मला हेदेखील माहीत नव्हतं की त्या मुलीचा भाऊसुद्धा आहे. एकूणच हा सगळा प्रकार पाहून माझे बॉडीगार्डही खाली आहे. मी त्यावेळी माझी चूक मान्य केली अन् त्या मुलाला सांगितलं की जर तुला मला मारायचे असेल तर तो मारू शकतो कारण माझ्याकडून चूक घडली आहे. माझी चूक असेल तर मी नेहमीच ती मान्य करतो, मी असाच आहे.”

‘गदर २’ हा २००१ साली आलेल्या ‘गदर एक प्रेम कथा या चित्रपटाचा सीक्वल आहे. २००१ प्रमाणेच या दुसऱ्या भागानेही प्रेक्षकांना वेड लावलं आहे. लवकरच ‘गदर २’ हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा पार करून शाहरुख खानच्या ‘पठाण’लाही मागे टाकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When sunny deol passed comment on a random girl and her brother came to fight with actor avn