बॉलिवूडचं हॉट कपल दीपिका आणि रणवीर सिंह यांच्या जोडीला नुकतच विमानतळावर स्पॉट करण्यातं आलं आहे. मुंबईमध्ये 14 एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे दीपिका आणि रणवीरने मुंबई बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. दीपिका आणि रणवीर बंगळुरुसाठी रवाना झाले आहेत.
बंगळुरुला रवाना होत असतना दीपिका आणि रणवीरला काही फोटोग्राफर्सनी स्पॉट केलं आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भैयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दोघांनी परिधान केलेल्या कपड्यांमुळे त्यांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मॅचिंग कपड्यांमध्ये कुठे निघाली जोडी?
या फोटोंमध्ये दीपिका रणवीरने एक सारखेच कपडे परिधान केल्याचं दिसतंय. दोघांनीदेखील काळी पॅन्ट परिधान केलीय. दीपिकाने त्यावर पांढर शर्ट परिधान केलंय तर रणवीरने पांढऱ्या रंगाचं टीशर्ट. दोघांनीही यावर निळ्या डेनिमचं जॅकेट चढवून लूक पूर्ण केला आहे. तर दोघांनी काहीसे सारखेच लेदर शूज घातल्याचं या फोटोत दिसतंय. तर दोघांनी करोना काळात काळजी घेण्यासाठी मास्क लावलं होतं. दोघं हातात हात घेवून चालत असल्याचं दिसतंय.
दीपिका आणि रणवीरच्या या कूल लूकने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. तर त्यांच्या या व्हायरल झालेल्या फोटोंवर अनेक चाहत्यांनी ‘परफेक्ट कपल’ दिसत असल्याचं म्हंटलं आहे.
दीपिका निघाली माहेरी!
मुंबईत पुन्हा संचारबंदी लागू झाल्याने दीपिका रणवीर बंगळुरूला रवाना झाले. दीपिकाचं कुटुंब बंगळुरुत आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात दीपिकाने तिला आईची आठवण येत असल्याचं म्हंटलं होतं. त्यामुळेच कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी दीपिका रणवीरसोबत बंगळुरूला गेली आहे.
विमानात प्रियांका चोप्राची कॉकटेल पार्टी, दारुच्या नशते अखेर ती…
दीपिका-रणवीरची जोडी लवकरच 83 या सिनेमात एकत्र झळकणार आहे. माजी क्रिकेटर कपिल देव यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असून यात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे.