बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या दीपिका ‘गहराइयां’ या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर दीपिका आता या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर अशाच एका प्रमोशन मुलाखतीत दीपिकाने तिचा आवडता अभिनेता कोण आहे? ते सांगितले आहे. दीपिकाचा आवडता अभिनेता बॉलिवूडमधला नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ईटाइम्स’ला दिलेल्या वृत्तानुसार दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले की, तिला दाक्षिणात्य अभिनेते प्रचंड आवडतात. दीपिकाचा आवडता अभिनेता पती रणवीर सिंह नाही तर पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुन आणि ज्युनियर एनटीआर आहे. दीपिकाला या दोघांचा अभिनय प्रचंड आवडतो. तर तिने त्या दोघांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : “ट्रेनमधून उडी मारायची इच्छा व्हायची…”, मृणाल ठाकूरने केला धक्कादायक खुलासा

याशिवाय तिच्या आवडत्या दिग्दर्शका विषयीही दीपिकाने सांगितले आहे. दीपिकाने सांगितले की तिला अयान मुखर्जीसोबत काम करायला नक्की आवडेल. या आधी त्यांच्यासोबत दीपिकाने ‘ये जवानी है दीवानी’ काम केलं आहे तरी सुद्धा तिला पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करायचे आहे. याशिवाय तिला एसएल राजामौली यांच्यासोबत काम करायची इच्छा व्यक्त केली.

आणखी वाचा : “हनिमूनला दुधाऐवजी …”, कपिल शर्माने केला बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवरबद्दलचा ‘तो’ खुलासा?

दरम्यान, दीपिका सिद्धार्थ आनंद यांच्या पठान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. या व्यतिरिक्त हृतिक रोशनसोबत ‘फाइटर’ या चित्रपटात दिसणार आहे. आज दीपिकाचा ‘गहराइयां’ ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone reveals not ranveer singh but she is obsessed with jr ntr and allu arjun dcp