बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया आज ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ८ जून १९५७ रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या डिंपल यांनी बालपणापासूनचं अभिनेत्री व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी निर्माता राज कपूर यांच्या ‘बॉबी’ (१९७३) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याच वर्षी त्यांनी वयाने स्वतःपेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं आणि चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह स्टोरी बद्दल…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांनीची पहिली भेट डिंपल यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करायच्या अगोदरच झाली होती. दोघंही अहमदाबादच्या एका स्पोर्ट्स क्लबमध्ये पहिल्यांदा भेटले होते. हिमांशू भाई व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार ७० च्या दशकात राजेश खन्ना नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी राजेश यांनी डिंपल आवडल्या होत्या आणि तिथेच दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली.

आणखी वाचा- ‘रामायण’ फेम अरुण गोविल यांनी खरेदी केली लग्झरी कार, चाहते म्हणाले “प्रभु कैसा वाहन ले आए”

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी १९७३ साली लग्न केलं. त्यावेळी राजेश खन्ना डिंपल यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठे होते. लग्नानंतर जवळपास ११ वर्ष डिंपल कोणत्याही चित्रपटात दिसल्या नाहीत. त्यांनी मोठ्या पडद्यावरून ब्रेक घेतला. दरम्यानच्या काळात त्यांच्या मुलं ट्विंकल आणि रिंकी यांचा जन्म झाला. डिंपल यांनी चित्रपटात काम करायचं होतं मात्र राजेश खन्ना यांचा याला विरोध होता. याच कारणाने काही काळानंतर राजेश आणि डिंपल यांच्या वाद होऊ लागले आणि लग्नानंतर ९ वर्षांनी दोघं विभक्त झाले. डिंपल कपाडिया राजेश खन्ना यांना सोडून आपल्या वडिलांच्या घरी राहू लागल्या. पती राजेश खन्ना यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर २ वर्षांनी ‘सागर’ चित्रपटातून डिंपल यांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं. त्यानंतर त्या बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसल्या

आणखी वाचा- “रोका, मेहंदी आणि संगीत…” लग्नाच्या चर्चांवर सोनाक्षी सिन्हानं अखेर सोडलं मौन

जेव्हा डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना वेगवेगळे राहू लागले आणि डिंपल यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं तेव्हा त्यांची सनी देओलशी जवळीक वाढल्याच्या चर्चा बी-टाऊनमध्ये सुरू झाल्या होत्या. दोघंही ११ वर्षं एकमेकांसोबत होते. डिंपल यांनी सनी देओलशी लग्न करायचं होतं पण तो विवाहित होता. आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन डिंपल यांच्याशी लग्न करायला तो तयार नव्हता. त्यामुळे तब्बल २७ वर्षं राजेश खन्ना यांच्यापासून वेगळं राहूनही डिंपल यांनी त्यांना घटस्फोट दिला नाही असं बोललं जातं. राजेश खन्नाच्या निधनाआधी अखेरचा काळ डिंपल त्यांच्यासोबत होत्या. १८ जुलै २०१२ रोजी राजेश खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dimple kapadia birthday she did not divorce from husband rajesh khanna after being separated for 27 years mrj