रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील प्रभु रामचंद्राच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले अभिनेता अरुण गोविल सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेकदा चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. तसेच त्यांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टी देखील ते सोशल मीडियावरूनत चाहत्यांसोबत शेअर करतात. अरुण गोविल यांनी नुकतीच मर्सिडिज- बेंज खरेदी केली. ज्याचा एक छोटासा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत अरुण गोविल यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

अरुण गोविल यांनी ‘रामायण’ मालिकेत प्रभु रामचंद्रांची भूमिका साकारून आता बरीच वर्षं झाली असली तरीही प्रेक्षक आजही त्यांना त्यांच्या नावाने नाही तर ‘प्रभु राम’ म्हणूनच ओळखतात. जेव्हा ते या मालिकेत काम करत होते त्यावेळी तर त्यांना भेटायला आलेले लोक त्यांच्या पाया पडत असतं. आता जेव्हा अरुण गोविल यांनी नवी कार खरेदी केली. तेव्हा त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ चाहत्यांनी धम्माल प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये अरुण गोविल यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील दिसत आहे.

rekha kissed richa chadha baby bump video_cleanup
Video: रेखा यांनी गरोदर रिचाच्या पोटावर केलं किस, बाळाला दिले आशीर्वाद; नेटकरी जया बच्चन यांचा उल्लेख करत म्हणाले…
Rekha intimate scenes with shekhar suman
४० वर्षांपूर्वी शेखर सुमन यांनी रेखाबरोबर केले होते इंटिमेट सीन; आठवण सांगत म्हणाले, “मला त्या दृश्यांचे शूटिंग करताना…”
Uday Samant, Uddhav thackeray, Uddhav thackeray working style, Uday Samant criticise Uddhav thackeray, party mla left Uddhav thackeray, victory Confidence in mahayuti, lok sabha 2024,
“…म्हणून आम्ही सगळ्यांनी शिंदेंसह उठाव केला”; उदय सामंत यांनी नागपुरात सांगितली……
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”

आणखी वाचा- “रोका, मेहंदी आणि संगीत…” लग्नाच्या चर्चांवर सोनाक्षी सिन्हानं अखेर सोडलं मौन

व्हिडीओ शेअर करताना अरुण गोविल यांनी लिहिलं, ‘देवाच्या कृपेने कुटुंबात नवीन वाहनाचा आगमन झालं आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांची अपेक्षा आहे’ अरुण गोविल यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. पण यासोबतच काही युजर्संनी यावर धम्माल प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी मात्र ही कार जर्मनी मेड असल्याच्या मुद्द्यावरून अरुण गोविल यांची खिल्ली देखील उडवली आहे.

आणखी वाचा- नुपूर शर्मा प्रकरणावर कंगना रणौतची प्रतिक्रिया; म्हणाली “जेव्हा हिंदू देवतांना अपमानित केलं जातं…”

अरुण गोविल यांच्या व्हिडीओवर कमेंट करताना एक युजरनं लिहिलं, “हे प्रभु, पुष्पक विमानाच्या जागी तुम्ही हे कोणतं मेड इन जर्मनी वाहन घेऊन आला आहात. किमान आपल्या भक्तांच्या भावनांचा तरी मान तुम्ही ठेवायला हवा होता.” दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, “प्रभु तुम्हाला काय गरज होती या गाडीची तुमच्यासाठी तर स्वर्गातून पुष्पक विमान आलं असतं.” तर आणखी एक युजरनं कमेंट केली, “अभिनंदन सर, त्रेतायुगात जर तुमच्याकडे ही कार असती तर जंगलातून वाट काढत श्रीलंकेत जाण्याची वेळ आली नसती.”