scorecardresearch

“रोका, मेहंदी आणि संगीत…” लग्नाच्या चर्चांवर सोनाक्षी सिन्हानं अखेर सोडलं मौन

सोशल मीडियावर सुरू असलेल्या लग्नाच्या चर्चांवर सोनाक्षी सिन्हानं प्रतिक्रिया दिली आहे.

sonakshi sinha, zaheer iqbal, sonakshi sinha wedding rumours, sonakshi sinha funny video, sonakshi sinha instagram, सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल, सोनाक्षी सिन्हा व्हिडीओ, सोनाक्षी सिन्हा लग्नाच्या चर्चा, सोनाक्षी सिन्हा मजेदार व्हिडीओ, जहीर इक्बाल गर्लफ्रेंड
आता सोनाक्षीनं लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल मागच्या काही काळापासून सतत्याने चर्चेत आहेत. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून सुरू होत्या. मात्र दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. पण आता सोनाक्षी सिन्हा आणि इक्बाल जहीर यांच्या नात्याचा अखेर खुलासा झाला आहे. इक्बालनं सोशल मीडियावर सोनाक्षीला ‘आय लव्ह यू’ म्हणत रिलेशनशिपच्या चर्चांना पुष्टी दिली आहे. त्यानंतर आता सोनाक्षीनं लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

सोनाक्षीनं लग्नाच्या चर्चांवर भाष्य करताना तिच्या इन्स्टाग्रामवर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने दिलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इन्स्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा शाहरुख खानच्या डायलॉगवर लिपसिंक करताना दिसत आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘प्रपोजल, रोका, मेहंदी आणि संगीत सर्वकाही तुम्ही ठरवलंच आहे तर कृपया मला देखील सांगा.’

आणखी वाचा- नुपूर शर्मा प्रकरणावर कंगना रणौतची प्रतिक्रिया; म्हणाली “जेव्हा हिंदू देवतांना अपमानित केलं जातं…”

सोनाक्षीचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून यावर अनेक सेलिब्रेटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोनाक्षीचा कथित बॉयफ्रेंड जहीर इक्बालनं तर यावर कमेंट करताना खूप साऱ्या हसणाऱ्या इमोजी पोस्ट केल्या आहेत. तर एका युजरनं कमेंट करताना लिहिलं, ‘खूपच क्यूट सोना, हे खूप विनोदी आहे.’ दरम्यान या व्हिडीओतून सोनाक्षी सध्या तरी तिचा लग्नाबाबत कोणताही प्लान नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल लवकरच ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात हुमा कुरैशीची देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जहीर इक्बालनं सलमान खान निर्मित ‘द नोटबुक’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं आहे. दरम्यान सोनाक्षीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की बॉलिवूड पदार्पण केलं त्यावेळी ती एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तिचं हे नातं ५ वर्ष चाललं. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2022 at 10:40 IST

संबंधित बातम्या