बॉलिवूड अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chaddha) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ११ ऑगस्टला आमिरचा हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबत नकारात्मक चर्चा सुरु होत्या. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत तर आमिरने स्वतः प्रतिक्रिया दिली होती. शिवाय चित्रपट पाहण्यासाठी देखील त्याने प्रेक्षकांना आवाहन केलं. मात्र या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Video : “माझे स्तन तापसीपेक्षा…” अनुराग कश्यपचं ‘ते’ विधान चर्चेत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉक्स ऑफिसवर आमिरचा हा चित्रपट अपयशी ठरत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’मुळे आमिरला मात्र मोठा धक्का बसला आहे. त्याने चित्रपटाला मिळालेलं अपयश पाहता मोठा निर्णय घेतला आहे. बरीच वर्ष एकाच चित्रपटावर काम करुन देखील मिळालेलं अपयश पाहून आमिर निराश झाला आहे.

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, आमिर आणि त्याची पहिली पत्नी किरण रावच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं की, “प्रेक्षकांनी ‘लाल सिंग चड्ढा’ला नाकारल्यामुळे आमिरला मोठा धक्का बसला आहे. हा चित्रपटासाठी त्याने बरीच मेहनत घेतली होती. चित्रपटाला मिळालेल्या अपयशाची जबाबदारी त्याने स्वतः घेतली आहे. तसेच यामुळे चित्रपट वितरकांची नुकसान भरपाई स्वतः करणार असल्याचा निर्णय आमिरने घेतला आहे.”

आणखी वाचा – चार महिन्यांपूर्वीच दिला मुलीला जन्म, आता दुसऱ्यांदा आई होणार ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री, पोस्ट व्हायरल

अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १२ कोटी रुपये कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईचा आकडा पूर्णच घसरला. दुसऱ्या दिवशी फक्त ७ कोटी ५० लाख रुपये या चित्रपटाने कमावले. इतकंच नव्हे तर चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकच नसल्यामुळे काही शो रद्द करण्यात आले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Failure of movie lal singh chaddha aamir khan shock by less response from audience he take decision see details kmd
First published on: 16-08-2022 at 16:35 IST