Premium

“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”

गौतमी पाटीलसाठी सर्वात चॅलेजिंग होता ‘हा’ कार्यक्रम

Gautami Patil
गौतमी पाटील

दिलखेच अदा आणि नृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. तिच्या कार्यक्रमातील गोंधळ आणि हुल्लडबाजीची घटना नेहमी समोर येत असते. असं असलं तरी गौतमीच्या कार्यक्रमाचे प्रमाण आणि तिची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. अशी ही लोकप्रिय नृत्यांगना आज ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’वर सहभागी झाली होती. यावेळी तिनं बालपणापासून ते आतापर्यंत आलेले वाईट अनुभव सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने लग्नाच्या अफवांवर सोडलं मौन; नाराजी व्यक्त करत म्हणाली…

‘एबीपी’च्या या ‘माझा कट्टा’वर गौतमीला विचारलं गेलं की, ‘सर्वात चॅलेजिंग कार्यक्रम कोणता होता? जिथली परिस्थिती हाताळणं तुझ्यासाठी अवघड होतं.’ यावर गौतमी म्हणाली की, “एका ठिकाणी आम्ही कार्यक्रमासाठी गेलो होतो, तिथे आम्हाला रुम देखील नव्हत्या. ओपन स्टेज होता, तिथे कोणीही नव्हतं. फक्त प्रेक्षक. तिथे मी गेलीये तर लोकं किती असतील याचा विचार करा. त्यात बाउंसर कमी. जे ठरवलेले बाउंसर होते, ते विचित्र होते. त्यांनी आम्हालाच त्रास द्यायला सुरू केलं. म्हणजे आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर त्रास द्यायला लागले. ती खूप भीतीदायक परिस्थिती होती.”

हेही वाचा – “तू लग्न कधी करणार?” अखेर गौतमी पाटीलने दिलं उत्तर, नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाली…

“आम्ही अक्षरशः मुली कशा तिथून निघालो, हे फक्त आम्हालाच माहित आहे. तिथल्या आयोजकांनी फार मदत केली. त्यांनी आमचे हात धरून आम्हाला गाडीत बसवलं. पण तिथली लोकं खूप भयानक होती. यापुढे तसे बाउंसर अजिबात नको. आता त्या ठिकाणी कार्यक्रम असेल तर ते बाउंसर आहेत का? मी याची विचारपूस पहिली करून घेते,” असं गौतमीनं सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautami patil talk about the incident when the bouncer gave trouble pps

First published on: 22-09-2023 at 20:37 IST
Next Story
लावणीने प्रेक्षकांना घायाळ करणारी गौतमी पाटील चित्रपटांमध्ये काम करणार का? उत्तर देत म्हणाली…