भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. दोघेचे त्यांच्या चिमुकल्या मुलासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असताता. नुकताच हार्दिक पांड्यांने लाडक्या लेकासोबतचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या क्यूट व्हिडीओला चाहत्यांची मोठी पसंती मिळतोय.
हार्दिक पांड्याने मुलगा अगस्त्यसोबतचा एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. अरजीत सिंहच्या ‘मे तेरा’ या गाण्यावर त्याने अगस्त्यसोबतचे काही खास क्षण शेअर केले आहेत. या व्हिडीओला त्याने “माझा मुलगा..माझं हृदय..माझं आयुष्य” असं कॅप्शन दिलंय. या व्हिडीओत हार्दिक तान्ह्या अगस्त्यसोबत मजामस्ती करताना दिसतोय.
हार्दिकच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांची व्हिडीओला मोठी पसंती मिळतेय. तर अनेक सेलिब्रिटींनीदेखल हार्दिकच्या व्हिडीओला कमेंट दिल्या आहेत. यात पहिलीच कमेंट अभिनेत्री अनुष्का शर्माने केलीय. अनुष्काने एक हार्टचं स्माईली देत या व्हीडीओला पसंती दिली आहे. तर हार्दिकची पत्नी नताशाने देखील कमेंटमध्ये इमोजी दिले आहे.
“सेम टू सेम”, मॅचिंग कपड्यांमध्ये दीपिका-रणवीर कुठे निघाले?
मुलासोबतचे क्षण चाहत्यांसोबत शेअर करण्याची हार्दिकची ही पहिली वेळ नाही. या आधी अनेकदा त्याने मुलासोबत निवांत क्षण घालवतानाचे फोटो शेअर केले आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये नताशाने अगस्त्यला जन्म दिला आहे. दोघं बऱ्याचदा मुलासोबच मजा करताना दिसतात.