Hemangi kavi post some photos of her upcoming web series rnv 99 | "काल मला माझी दुर्गा भेटली..." हेमांगी कवीने 'या' अभिनेत्रीसाठी केलेली खास पोस्ट चर्चेत | Loksatta

“काल मला माझी दुर्गा भेटली…” हेमांगी कवीने ‘या’ अभिनेत्रीसाठी केलेली खास पोस्ट चर्चेत

हेमांगीने केलेली पोस्ट ही रवी जाधव दिग्दर्शित नव्या वेबसिरीजबद्दल आहे.

“काल मला माझी दुर्गा भेटली…” हेमांगी कवीने ‘या’ अभिनेत्रीसाठी केलेली खास पोस्ट चर्चेत

मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. ती नेहमी विविध विषयांवर सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. त्यासोबतच ती तिच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दलही नेहमी भाष्य करत असते. तिने नुकत्याच केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा : क्रूर औरंगजेब, छत्रपती शिवरायांचे बुद्धीचातुर्य अन् आग्र्याहून सुटकेचा थरार; अंगावर काटा आणणारा ‘शिवप्रताप गरुडझेप’चा ट्रेलर प्रदर्शित

हेमांगीने केलेली पोस्ट ही रवी जाधव दिग्दर्शित नव्या वेबसिरीजबद्दल आहे. रवी जाधव हे सध्या ज्या वेबसिरीजचं दिग्दर्शन करत आहेत त्यात हेमांगी काम करतेय. त्या वेब सिरीजमध्ये हेमांगी ज्या अभिनेत्रीबरोबर काम करत आहे तिच्याबरोबर काम करण्याचं आपलं स्वप्न रवी जाधव यांनी पूर्ण केलं यासाठी हेमांगीने पोस्टमध्ये रवी जाधव यांचे आभारही मानले आहेत.

हेमांगीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. हे फोटो पोस्ट करताना तिने लिहिले, “काल मला माझी दुर्गा भेटली.दगड मातीच्या मूर्तींपेक्षा मी माणसांमध्ये देव शोधते आणि मला भेटतात ही.मी आणि रवी जाधव सर एकाच कॉलेज चे, जे जे चे.रवी सर माझे सीनियर. २००८ ला माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी धुडगूससाठी रवी सरांनी campaigning केलं होतं ते थेट आता एकत्र काम करायचा योग जुळून आला आणि काय कमाल योग जुळून आलाय. रवी सरांच्या आगामी web series मध्ये मी जिच्यासोबत काम करतेय ती माझ्यासाठी दुर्गाच आहे. एका अर्थी आज मी जिथे आहे ते तिच्या मुळेच! योग्य वेळ आल्यावर सांगेनच कसं ते! पण ज्याची कल्पना ही केलेली नसते साधं स्वप्न ही पाहिलेलं नसतं जेव्हा ते आपल्या समोर उभं राहतं तेव्हा आपलं काय होत असेल ओ?

ती साक्षात माझ्या समोर उभी होती! कसं? तिला डोळ्यात सामावून घेऊ की खूप बोलू की गप्प बसून नुसतं न्याहाळत राहू? Scene करताना ती माझ्या डोळ्यात बघत होती, हातात हात घेत होती, मला जवळ घेत होती. सीन संपल्यावर मला मिठी मारत होती! आई शप्पथ! प्रश्न पडत होते, Is this real? सांगणार सगळं सांगणार तोपर्यंत…Ravi Sir I owe this to you. Big time. इंडस्ट्रीतले लोक तुम्हांला प्रेमानं, लाडानं ‘देवा’ म्हणतात ना…मी म्हणेन, ‘देवा मी न मागता माझ्या पदरात हे दान टाकलस की रे! काल दिवसाची सुरवात देवीच्या दर्शनाने झाली तर सांगता इंद्रधनू ने!यालाच देव पावल्याचे संकेत म्हणायचे. घटस्थापना आणि शारदीय नवरात्रीच्या तुम्हांला सर्वांना शुभेच्छा!”

हेही वाचा : ‘मी तुमची ही कमेंट दुर्लक्षित करु शकते पण…’ नेटकऱ्याच्या प्रश्नावर भडकली हेमांगी कवी

हेमांगीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिच्या सहकलाकाराचा चेहरा दिसत नसल्याने हेमांगीने जिच्याबरोबर काम केले ती अभिनेत्री कोण हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत. ती अभिनेत्री कोण असेल याचा सगळे अंदाज लावत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-09-2022 at 14:09 IST
Next Story
“इथे पीडिता हिंसेचा सामना करायला…” ट्रोलिंगबाबत स्वरा भास्करने मांडलं स्पष्ट मत