बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी तिच्या चित्रपटांपेक्षा क्रिकेटर केएल राहुलसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. केएल राहुल आणि अथियाने त्यांच्या नात्याविषयी कधीच पुढे येऊन काही सांगितले नाही. तरी, या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं असतात. दरम्यान, अथियाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अथिया ही केएल राहुल आणि भारतीय टीमसोबत आहे असे चित्र दिसतं आहे.

आणखी वाचा : Video : असा साजरा केला शिल्पा शेट्टीने आपला ४६ वा वाढदिवस

अथियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. अथियाचा हा ब्लॅक अँड व्हाइट फोटो आहे. हा फोटो पाहिल्यानंतर ती इंग्लंडमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हा फोटो शेअर करत ‘तुमची एनर्जी वाचवा’, अशा आशयाचे कॅप्शन अथियाने दिले आहे. हे पाहता नेटकऱ्यांनी अथियाला प्रश्न विचारला की ती इंग्लंडमध्ये केएल राहुल सोबत आहे का. अथियाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

खरतरं ही चर्चा केएल राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या फोटोमुळे सुरु झाली. केएल राहुल आणि अथियाच्या फोटोच बॅकग्राऊंड सेम आहे.

आणखी वाचा : राखीला किस ते दुबईमध्ये जेलची हवा, जाणून घ्या मिका सिंगच्या कॉन्ट्रोव्हर्सी

दरम्यान, सध्या भारतीय क्रिकेट टीम ही न्यूझीलंड संघा विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचली आहे.