संजय लीला भन्साळी यांचा ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. पण तुम्हाला माहीत आहे का की, संजय लीला भन्साळी आधी पूर्णपणे वेगळ्या कलाकारांसह हा चित्रपट बनवत होते; पण त्यावेळी त्यांना हा चित्रपट बनवता आला नाही.

ईशा कोप्पीकरला संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’मध्ये ‘काशीबाई’ची भूमिका करायची होती. ईशाने स्वतः हे उघड केले. ‘झूम’शी खास संभाषणात ईशाने सांगितले की, संजय लीला भन्साळी पूर्वी हा चित्रपट पूर्णपणे वेगळ्या कलाकारांसह बनवत होते आणि तिला काशीबाई’ची भूमिका हवी होती.

ईशा कोप्पीकरला साकारायची होती ‘काशीबाई’ची भूमिका

ईशा कोप्पीकर म्हणाली, ” ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट पूर्णपणे वेगळ्या कलाकारांसह बनवला जात होता. मी संजयसरांना ‘बाजीराव मस्तानी’च्या कास्टिंगदरम्यान भेटले होते, तेव्हा ते काही वर्षांपूर्वी वेगळ्या कलाकारांसह हा चित्रपट बनवत होते. त्यांनी कास्टिंगही पूर्ण केले होते; पण तेव्हा तो चित्रपट त्यांना बनवता आला नाही आणि नंतर त्यांनी अखेर तो चित्रपट बनवला. हे ‘बाजीराव मस्तानी’च्या रिलीजच्या १५ वर्षांपूर्वी घडले. मी तेव्हा नवीन होते.”ईशा कोप्पीकर म्हणाली की, संजय लीला भन्साळींनी तिला ही भूमिका ऑफर केली नव्हती; परंतु चित्रपटात काशीबाई (प्रियाका चोप्रा)ची भूमिका साकारण्यासाठी ती त्यांना भेटायला गेली होती.

जर या वृत्तांवर विश्वास ठेवला, तर संजय लीला भन्साळी प्रथम सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना घेऊन हा चित्रपट बनवू इच्छित होते. सलमान आणि ऐश्वर्या यांनी यापूर्वीच संजय लीला भन्साळींबरोबर ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात काम केले होते.

२००५ मध्ये एकता कपूरचा ‘क्या कूल है हम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. पण, तरीही या चित्रपटाने मोठी कमाई केली होती. पाच कोटींच्या या चित्रपटाने २३ कोटी कमावले होते. या चित्रपटामुळे अभिनेत्री ईशा कोप्पीकरलादेखील मोठी लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात अभिनेत्रीने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

ईशा कोप्पीकर कृष्णा कॉटेज, पिंजर, क्या कूल हैं हम व डॉन यांसारख्या चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखली जाते. ती शेवटची २०२४ मध्ये ‘अयालान’ या तमीळ चित्रपटात दिसली होती.