‘सेक्स’ हा विषय अजूनही आपल्या देशात चार चौघांत चर्चा करण्यासारखा मानला जात नाही. या विषयावर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बरीच चर्चा होत असली, बरेच तज्ञ यावर उघडपणे भाष्य करत असले तरी ‘सेक्स’ शब्द कानावर पडताच कित्येकांची नाकं मुरडतात. बरेच सेलिब्रिटीजसुद्धा या विषयावर उघडपणे बोलायचं टाळतात. पण रणवीर सिंगने त्याच्या नव्या जाहिरातीतून एका अशाच गंभीर विषयावर भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणवीर सिंगने पॉर्नस्टार जॉनी सीन्सबरोबर केलेली एक जाहिरात सध्या चांगलीच चर्चेत आहे. यावरून बराच गदारोळही झाला. या जाहिरातीत एक विवाहित तरुणी रणवीरकडे त्याचा भाऊ जॉनी सीन्सबद्दल तक्रार करताना दिसत आहे. जाहिरातीमध्ये बरेच डबल मिनिंग संवाद आपल्याला ऐकायला मिळतात ज्यावरून आपल्याला हे स्पष्ट होतं की पुरुषांच्या सेक्स प्रॉब्लेमबद्दल यात भाष्य करण्यात आलं.

आणखी वाचा : “निर्मात्यांनी याचा गैरफायदा…” सुरुवातीच्या काळातील ‘सिरियल किसर’ या प्रतिमेबद्दल इमरान हाश्मी स्पष्टच बोलला

अत्यंत गंभीर विषय पण फार विनोदी पद्धतीने या जाहिरातीत हाताळण्यात आला. जॉनी सीन्सचे सेक्स प्रॉब्लेम दूर करणाऱ्या रणवीरची ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. ‘बोल्ड केअर’ या ब्रॅंडसाठी रणवीर आणि जॉनी सीन्स यांनी मिळून ही जाहिरात केली. ही जॉनीची पहिलीच भारतीय जाहिरात आहे. भारतात येऊन जाहिरात शूट करण्याच्या अनुभवाबद्दल नुकतंच जॉनीने भाष्य केलं आहे. आजवर सेटवर १५० लोक जॉनीने कधीच पहिलेले नसल्याचा खुलासा केला आहे.

प्रसिद्ध कॉमेडीयन व या जाहिरातीचा लेखक तन्मय भट्ट याच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जॉनीने भारतात काम करण्याच्या अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे. जॉनी म्हणाला, “जेव्हा तुम्ही एखादा देश फिरायला येता अन् कामानिमित्त तुम्ही फारसं काहीच बघत नाही तेव्हा फार वाईट वाटतं. इथले लोक फारच प्रेमळ आहेत, सगळेच माझ्याशी अगदी अदबीने वागत होते. एकूणच भारतातला हा अनुभव फारच वेगळा आणि स्मरणात राहील असा होता.”

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर आपटलेला रजनीकांत यांचा ‘लाल सलाम’ लवकरच येणार ओटीटीवर; वाचा कधी अन् कुठे पाहता येणार?

या जाहिरातीमध्ये जॉनी सीन्स असणार आहे ही गोष्ट गुप्त ठेवण्यात आली होती. जॉनी भारत दौऱ्यावर आहे ही गोष्ट फक्त आणि फक्त निर्मात्यांनाच ठाऊक होती अन् या जाहिरातीसाठीच जॉनीला बोलावण्यात आलं होतं. भारतात चित्रीकरणादरम्यानचा अनुभव जॉनीने शेअर केला आहे. तो म्हणाला, “मी सेटवर आजवर १५० लोक काम करताना कधीच पाहिलेली नाहीत. अमेरिकेत आमच्या शुटींगच्या सेटवर फारफार तर १५ लोक असतात. सध्या तर तिथे सेटवर फक्त मी आणि अभिनेत्री पकडून ३ ते ५ लोकच पाहायला मिळतात.” सोशल मीडियावर एकीकडे बऱ्याच लोकांनी रणवीर सिंगच्या या जाहिरातीचं कौतुक केलं आहे तर काहींनी या गोष्टीवर टीकाही केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Johnny sins speaks about his working experience with ranveer singh in commercial avn