बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिची बहिण अभिनेत्री करीना कपूर या दोघीही काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमधील ‘लोलो’आणि ‘बेबो’ अशा नावाने त्याला ओळखले जाते. त्या दोघीही एकमेकींच्या खूप जवळ आहेत. या दोघीजणी एकमेकींच्या बहिणी असण्याबरोबरच चांगल्या मैत्रिणीदेखील आहेत. त्या दोघीही अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. नुकतंच करीना आणि करिश्मा या दोघींनीही एका पार्टीला हजेरी लावली. या पार्टीतील अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राच्या याच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी त्याच्या घरी हजेरी लावली. करीना कपूर, करिश्मा कपूर, करण जोहर आणि नताशा पुनावाला हे कलाकार या पार्टीत सहभागी झाले होते. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
घटस्फोटानंतर करिश्माला कपूरला आजही संजय कपूरकडून पोटगी म्हणून मिळते ‘एवढी’ रक्कम

यावेळी करीनाने अगदी आरामदायक कपडे परिधान केले होते. या पार्टीसाठी तिने पांढरा टी-शर्ट आणि काळा पायजामा परिधान केला होता. तर करिश्माने काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता. तर करण जोहरने काळ्या रंगाची हुडी परिधान केली होती. तर नताशाने गोल्डन रंगाचा वनपीस घातला होता.

या व्हिडीओत त्या दोघीही मनीषच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी त्या दोघींनाही पापाराझींनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले. या व्हिडीओनंतर त्यांना ट्रोलही केले जात आहे. या व्हिडीओवर अनेकांनी त्या दोघीही दारु प्यायल्या आहेत असे सांगत कमेंट करताना दिसत आहेत. यात एका नेटकऱ्याने ‘किती दारु प्यायला’ असा प्रश्न त्यांना विचारला आहे. तर एकाने ‘लाल सिंग चड्ढाची फ्लॉप पार्टी’ असे म्हटले आहे. ‘कसे लपून लपून येतात ही लोकं’, असे एक नेटकरी म्हणाला आहे. ‘ड्रग्ज आणि दारु घेणारे हे लोक बघण्याची इच्छा नाही’, असे एका नेटकरी म्हणाला आहे.

जेव्हा अजय देवगणसोबत लग्नाच्या चर्चांवर करिश्मा कपूरने दिले होते स्पष्टीकरण, म्हणाली “त्याला माझ्याबाबत…”

दरम्यान करिश्मा ही ऑल्ट बालजीच्या मेंटल हुड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. त्यानंतर आता ती ब्राऊन या चित्रपटात झळकणार आहे. तर करीना कपूर ही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor karisma kapoor karan johar clicked outside manish malhotra home after party video troll nrp