बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

करीनाचा हा व्हिडीओ तिच्या एका फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत करीनाने काळ्य रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. ती स्वत:ला आरशात बघत असून तिच्या पाठी असलेलं करीनाचं वॉडरोब दिसत आहे. तिच्या या वॉडरोबमध्ये अनेक अप्रतिम हील्स आणि शूजचं कलेक्शनं दिसतं आहे. तर दुसऱ्या बाजुला डिझायनर हॅन्डबॅग दिसत आहेत. एक लाकडाची खुर्ची आणि ड्रेसिंग टेबल दिसतं आहे.

आणखी वाचा : “मुलाखती देऊनही आम्हाला… ”,‘गंगुबाई’मधील दृश्यांवरुन कामाठीपुरामधील स्थानिकांची चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

आणखी वाचा : “मलाच सगळं करावं लागत अन् माझ्या भावाला….”; अमिताभ बच्चन यांच्या नातीने घरात होणाऱ्या भेदभावावर केले होते वक्तव्य

आणखी वाचा : युक्रेनच्या ‘या’ महिलेला घाबरत होते रशियाचे राष्ट्रपती पुतिन

दरम्यान, करीना हा ड्रेस परिधान करून फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरच्या लग्नाच्या पार्टीमध्ये गेली होती. करीनाने या वेळी चित्त्याची प्रिंट असलेल्या हिल्स घातल्या होत्या. दरम्यान, करीनासोबत या पार्टीमध्ये मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि करिश्मा कपूर यांनी हजेरी लावली होती. या चौघींनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.