स्टंट बेस्ट रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ हा सर्वात लोकप्रिय शो ठरला आहे. याचं सुत्रसंचालन रोहित शेट्टी करतोय. या शोमध्ये टीव्ही क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकार खतरनाक स्टंट करताना दिसून येतात. ‘खतरों के खिलाडी’च्या ११ व्या सीजनची शूटिंग केपटाउनमध्ये सुरूय. मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरे या सीजनमध्ये झळकणार आहेत. या शो मधील सगळेच कलाकार त्यांचे वेगवेगळे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशात या शोमधून स्पर्धकांच्या एलिमिनेशसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय.
रोहित शेट्टीच्या शोमध्ये होणार मास एलिमिनेशन !
खरं तर या शोच्या फॉरमॅटनुसार प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धक एलिमिनेट होत असतो. पण यंदाच्या सीजनमध्ये एक मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. या शोमध्ये एक मोठा शॉकींग एलिमिनेशन होणार असल्याचं बोललं जातंय. यात एक नाही, दोन नाही तर एकूण पाच स्पर्धक एकत्र या शोमधून आऊट होणार आहेत. या शोमध्ये पहिल्यांदा मास एलिमिनेशन झालेलं पहायला मिळणार आहे.