2001 साली रिलीज झालेला ऑस्कर नॉमिनेटेड सुपरहिट चित्रपट ‘लगान’ रिलीज होऊन आज २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने एका माध्यमाशी बोलताना ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने या चित्रपटातला एक मजेदार किस्सा शेअर केलाय. यासोबत त्याने चित्रपटातील काही खास आठवणी देखील शेअर केल्या आहेत.
‘लगान’ सारखे चित्रपट विचार करून बनत नाहीत, तर…
यावेळी माध्यमाशी बोलताना आमिर खान म्हणाला, “आमच्या ‘लगान’ चित्रपटाने २० वर्षे पूर्ण केली आहेत, तरी आजही लोक या चित्रपटाचं नाव घेत असतात. आजही आमचा ‘लगान ११’ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रूप आहे आणि आम्ही सगळेच जण त्यावर गप्पा मारत असतो. वर्षातून एकदा का होईना आम्ही सगळेच जण भेटत असतोच. मी असं म्हणेल की ‘लगान’ सारखे चित्रपट हे बनवले जात नाहीत, तर ते आपोआप बनतात आणि आज आपण २० वर्षानंतर सुद्धा या चित्रपटाविषयी बोलतोय. प्रेक्षकांनी ‘लगान’ चित्रपटाला खूप प्रेम दिलं. मी यासाठी सर्वांचाच आभारी आहे. एक प्रोड्यूसर म्हणून माझा हा पहिलाच चित्रपट होता, त्यामूळे हा चित्रपट माझ्यासाठी खूपच खास आहे.”