मराठी चित्रपटसृष्टी गाजवून हिंदी चित्रपटसृष्टीत गेलेल्या आणि तेथेही सशक्त अभिनयामुळे गाजलेल्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये अश्विनी भावे यांचे नाव आवर्जून घेतले जाते. लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत मात्र त्यांची नाळ अजूनही देशाशी जोडली गेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात आपल्या उपक्रमांबद्दल माहिती देत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अश्विनी भावे यांनी नुकतीच गुहागरला भेट दिली आहे. एका चित्रीकरणाच्या निमित्ताने त्या गुहागरला गेल्या होत्या. तेव्हा गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्या असं म्हणतात “कोकणातील माझी सर्वात आवडती जागा म्हणजे गुहागर, एका शूटिंगच्या निमित्ताने मी इथे आलेय, आज मोकळा दिवस आहे कित्येक वर्षांनी मी गुहागरच्या बीचवर आलेय, इथे कोणी नाहीये, निरव शांतता आहे. सूर्यास्त बसून एन्जॉय करता येतोय हे केवढं सुख आहे.” व्हिडीओमध्ये त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील काही क्षण टिपले आहेत.

Video : “कोकण आणि ट्रेनचा प्रवास म्हणजे…” रुचिरा जाधवचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

अश्विनी यांना मायक्रोबायोलॉजीमध्ये करिअर करायचं होतं. मात्र कला शाखेकडे कल अधिक असल्याने त्यांनी नंतर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यांनी तत्त्वज्ञान या विषयातून पदवी घेतली. ‘गगनभेदी’ या व्यावसायिक नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणातच त्यांना आर. के. बॅनरचा ‘हीना’सारखा चित्रपट करायला मिळाला.

मांजा आणि ध्यानीमनी या चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या होत्या. राईकर केस या वेबसीरिजमध्ये त्यांनी काम केले आहे. तसेच ‘अशी ही बनवाबनवी’, ‘सरकारनामा’, ‘कळत नकळत’, ‘कदाचित’, अशा एकाहून एक सुपरहीट सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress ashwini bhave shared video of guhagar beach spg