‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आर्या आंबेकर प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून आर्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आर्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. प्रोफेशनल आयुष्याबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही आर्या चाहत्यांबरोबर शेअर करीत असते. अशातच अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगाला आर्याने खास हजेरी लावली होती. या संदर्भात आर्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्याने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर संकर्षणसह एक फोटो शेअर केला आणि लिहिलं, “काल ‘नियम व अटी लागू’ चा प्रयोग पाहिला. खूप मस्त नाटक आहे. तुझ्या लिखाणाने, अभिनयाने आणि गाण्याने तू एकदम विलक्षण काम केलं आहेस.”

हेही वाचा… “डोक्यातून रक्त वाहत होतं आणि…” जखम झाल्यावरही ‘त्या’ अभिनेत्याने सुरूच ठेवलं नाटक; चिन्मय मांडलेकर म्हणाला…

आर्याने शेअर केलेली ही पोस्ट संकर्षणनं रिपोस्ट केली आहे. “खूप खूप धन्यवाद” अशी कॅप्शन संकर्षणनं या फोटोला दिली आहे. अनेक कलाकार संकर्षणच्या नाटकाला उपस्थिती दर्शवितात आणि आपल्या प्रतिक्रियाही देतात. याआधी संकर्षणच्या नाटकचा प्रयोग अकलूजला पार पडला होता आणि तेव्हा अभिनेत्री रिंकू राजगुरू तिच्या कुटुंबासमवेत हा प्रयोग पाहायला गेली होती. कारण- रिंकू खुद्द अकलूजची आहे. संकर्षण तिच्या शहरात येणार म्हटल्यावर ती नाटकाला हजर झाली आणि काहीही गरज लागली तरी हक्कानं सांग, असंही संकर्षणला म्हणाली. त्याबाबत संकर्षणनं त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा… “ती तीन-चार तास रडते”; रश्मिका मंदानाच्या १० वर्षांच्या बहिणीला व्हायचेय अभिनेत्री; किस्सा सांगत म्हणाली…

दरम्यान, आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषांतील अल्बम्समध्ये गाणी गायली आहेत. त्याबरोबर तिनं काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठीदेखील गाणी गायली आहेत. तर संकर्षणच्या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर, ‘नियम व अटी लागू’ या नाटकात अमृता देशमुख, प्रसाद बर्वे यांनीही भूमिका केल्या आहेत. या नाटकाचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarya ambekar appreciate sankarshan karhade for his skills in niyam va ati lagoo natak dvr