अभिनेता चिन्मय मांडलेकर याने नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध ठिकाणी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्याने आपल नाव कमावलं. मराठी चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यापासून ते ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये फारुख मल्लिक बिट्टा या खलनायकाची भूमिका साकारण्यापर्यंत चिन्मयने आपल्या अभिनयाने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलं आहे.

चिन्मय मांडलेकर लिखित–दिग्दर्शित ‘गालिब’ नाटकाच्या निमित्ताने चिन्मयने झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात चिन्मयने नाटकादरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला ज्यात त्याच्या सहकलाकाराला मोठी जखम झाली होती.

Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
marathi actress Supriya Pilgaonkar react on chinmay mandlekar getting trolled for his son name jehangir
“जहांगीर…”, चिन्मय मांडलेकरच्या लेकाच्या नावावरील ट्रोलिंगवर सुप्रिया पिळगावकरांची मार्मिक पोस्ट, म्हणाल्या…
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल

हेही वाचा… “मी रंगदेवतेची माफी…”, नाटकादरम्यान भार्गवी चिरमुलेने केली होती ‘ही’ चूक, म्हणाली…

पुरस्कार सोहळ्यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत चिन्मयने त्याच्या आठवणीतला नाटकात घडलेला एक किस्सा सांगितला. चिन्मय म्हणाला, “नाटकाच्या तालमीत किंवा नाटकाच्या प्रयोगांमध्ये अनेक गमतीजमती आणि विनोदी किस्से घडत असतात. पण माझी जी एक आठवण आहे ती माझ्या एका सहकलाकाराबद्दलची आठवण आहे. तो सहकलाकार म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ चांदेकर.”

हेही वाचा… जॅकलिन फर्नांडिसच्या ‘YIMMY YIMMY’ गाण्यावर सहकलाकारांसह थिरकल्या ऐश्वर्या नारकर; नेटकरी म्हणाले, “ताई तुम्हीच…”

चिन्मय पुढे म्हणाला, “आम्ही ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाचे प्रयोग करत होतो. ते नाटक खूप गाजलं होतं. एका प्रयोगामध्ये सिद्धार्थला ब्लॅकआऊटमध्ये नेमक कुठे जायचं हे कळलं नाही आणि तो स्टेजवरून खाली पडला. त्याच्यानंतर अख्खा प्रयोग त्याच्या डोक्यातून भळभळती जखम वाहत होती आणि ती जखम तशीच घेऊन त्याने पुढचा सगळा प्रयोग पूर्ण केला.”

“तेव्हा आम्हा स्टेजवरच्या लोकांना खूप भीती वाटत होती की सिद्धार्थचं इतक रक्त वाहतंय, कदाचित तो चक्कर येऊनही पडू शकतो. पण अशा अवस्थेत सिद्धार्थने प्रयोग पूर्ण केला आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तर सिद्धार्थच्या या स्पीरीटसाठी हॅट्स ऑफ.” असंही चिन्मय म्हणाला.

दरम्यान, झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा ७ मार्चला झी टॉकीज या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.