आपल्या खेळीने क्रिकेटचं मैदान गाजवणारा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड कालच विवाह बंधनात अडकला. गेले दोन-तीन दिवस त्याच्या लग्न समारंभाच्या मेहंदी, हळद अशा विविध कार्यक्रमांचे फोटो व्हायरल होत होते. तर काल त्याने उत्कर्षा पवारशी लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटो समोर येताच सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर अभिनेत्री सायली संजवनेही या नवविवाहित दांपत्याचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेले अनेक महिने सायली संजीवचं नाव ऋतुराज गायकवाडशी जोडलं जात होतं. ते दोघे डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण सायलीने अनेकदा यावर भाष्य करत त्या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. तर गेल्या आठवड्यात चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर ऋतुराजने त्याचा होणाऱ्या पत्नीबरोबरचा फोटो शेअर केला. त्यावर सायलीने केलेल्या कमेंटने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. तर आता सायलीने त्यांना लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : “मी ज्यांना प्रपोज केलं त्यांनी…”; सायली संजीवचा प्रेमाबद्दल मोठा खुलासा

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा यांचं लग्न त्यांचे नातेवाईक व जवळची मित्र मंडळी यांच्या उपस्थितीत पार पडलं. त्यांच्या लग्नाचे फोटोही समोर आले. या फोटोंवर ऋतुराजच्या चाहत्यांनी, याचबरोबर त्यांच्या मित्रमंडळींनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. तर अभिनेत्री सायली संजीवने ऋतुराज आणि उत्कर्ष यांच्या लग्नाचे फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, “मी तुम्हा दोघांसाठी खूप खुश आहे. अभिनंदन…!”

हेही वाचा : “कोणालाही कळू न देता मी…” अखेर सायली संजीवने उघड केलं गुपित

आता सायली संजीवची ही इन्स्टाग्राम स्टोरी खूप चर्चेत आली आहे. तर दुसरीकडे ऋतुराजच्या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स करत ऋतुराज आणि उत्कर्षाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress sayali sanjeev shared photo of ruturaj gaikwad wedding and congratulate newly wed couple rnv