‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत आहेत. आता या चित्रपटाने कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटालाही एका बाबतीत मागे टाकलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट कार्तिक आर्यनच्या चित्रपटाला जोरदार टक्कर देताना दिसत आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची कथा, संवाद, या चित्रपटाचं दिग्दर्शन, गाणी या सगळ्यालाच प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. पहिल्या आठवड्याच्या शेवटी ६.४५ कोटींचा गल्ला जमवत हा चित्रपट पहिल्या वीकएण्डला सर्वाधिक कमाई करणारा यावर्षीचा मराठी चित्रपट ठरला आहे. तर याचबरोबर आता या चित्रपटाने IMDB साईटवरही कमाल केली आहे.

आणखी वाचा : ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लिहिलं आहे ‘बाईपण भारी देवा’तील अत्यंत गाजत असलेलं गाणं, अनुभव शेअर करत म्हणाली…

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला IMDB या साईटवर कार्तिक आर्यनच्या चित्रपटापेक्षा जास्त रेटिंग्स मिळाले आहेत. या साईटवर ‘बाईपण भारी देवा’ला ८.८ रेटिंग्स आहेत, तर दुसरीकडे कार्तिक आर्यांच्या चित्रपटाला ७.५ रेटिंग्स आहेत. त्यामुळे हा मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांवर चांगलाच भारी पडलेला दिसत आहे.

हेही वाचा : “सुक्कु ताईला एवढंच सांगणं आहे की…,” सुकन्या मोनेंकडे केदार शिंदेंनी व्यक्त केली इच्छा

दरम्यान, हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baipan bhari deva film gets more imdb ratings than kartik aaryan starrer satyaprem ki katha rnv