Filmfare Awards Marathi 2025 Winners List : मराठी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा ‘फिल्मफेअर मराठी’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा या सोहळ्याला मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार देखील उपस्थित होते. तब्बू, राजकुमार राव, नवाजुद्दिन सिद्दिकी या सेलिब्रिटींचा यात समावेश आहे.
‘फिल्मफेअर मराठी २०२५’ या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन यावर्षी सिद्धार्थ चांदेकर व अमेय वाघ यांनी केलं. या कार्यक्रमासाठी संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी एकत्र आली होती. यंदाच्या ‘फिल्मफेअर मराठी’ सोहळ्यात आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ चित्रपटाला भरभरून यश मिळालं. याशिवाय प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाने देखील बहुतांश पुरस्कार जिंकले. विजेत्यांची यादी पाहुयात…
‘फिल्मफेअर मराठी २०२५’ – पुरस्कार सोहळ्यातील संपूर्ण विजेत्यांची यादी
- सर्वोत्कृष्ट चित्रपट – पाणी
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – महेश मांजरेकर – जुनं फर्निचर
- सर्वोत्कृष्ट चित्रपट ( परीक्षक पसंती ) – गाठ
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – प्राजक्ता माळी – फुलवंती आणि वैदेही परशुरामी ( एक दोन तीन चार )
- सर्वोत्कृष्ट अभिनेता ( परीक्षक पसंती ) – जितेंद्र जोशी – गाठ
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( परीक्षक पसंती ) – राजश्री देशपांडे – सत्यशोधक
- सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री – जुई भागवत – लाइक अँड सबस्क्राइब
- सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता – धैर्य घोलप – येक नंबर
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता – क्षितीश दाते – धर्मवीर २
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री – नम्रता संभेराव – नाच गं घुमा
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – आदिनाथ कोठारे – पाणी
- सर्वोत्कृष्ट गायिका – वैशाली माडे – फुलवंती ( मंदनमंजिरी )
- सर्वोत्कृष्ट गायक – राहुल देशपांडे – अमलताश
- सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम २०२५ – फुलवंती
- सर्वोत्कृष्ट संवाद – महेश मांजरेकर – जुनं फर्निचर
- फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार – उषा मंगेशकर
- सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले – नितीन दीक्षित – पाणी
- सर्वोत्कृष्ट कथा – गाठ चित्रपट
- सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक – नवज्योत बांदिवडेकर – ‘घरत गणपती’ आणि राहुल पवार
- सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन – एकनाथ कदम – फुलवंती
- सर्वोत्कृष्ट संगीत – अनमोल भावे – पाणी
- सर्वोत्कृष्ट Costume डिझाइन – फुलवंती
- सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर – उमेश जाधव – फुलवंती
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – गुलराज सिंग – पाणी
- सर्वोत्कृष्ट एडिटिंग – गाठ चित्रपट
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – महेश लिमये – फुलवंती
दरम्यान, सध्या या सगळ्या विजेत्या कलाकारांवर मराठी चित्रपटसृष्टीतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.