Rajeshwari Kharat on Conversion: ‘फँड्री’ या चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरातला मोठी लोकप्रियता मिळाली. आजही लोक तिला शालू म्हणून ओळखतात. अभिनेत्री अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेदेखील मोठ्या चर्चेत असते.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

काही दिवसांपूर्वी राजेश्वरीने फोटो शेअर केले होते. त्यानंतर अभिनेत्रीने धर्मांतर केल्याचे म्हटले जात होते. आता यावर राजेश्वरीने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने धर्मांतर केले आहे का, या प्रश्नाचे उत्तर दिले.

“लहानपणापासूनच मी ख्रिश्चन आहे”

अभिनेत्री म्हणाली, “मला असं सांगायचं आहे की ख्रिश्चन घरातच माझा जन्म झाला. लहानपणापासूनच मी ख्रिश्चन आहे. मी कोणता धर्म बदलला नाही. माझ्या मनात खंत एवढीच आहे की लोकांचा दृष्टिकोन खूप मर्यादित आहे. इतका मर्यादित आहे की त्यांना पुढचं सत्य पाहायचंच नाही. मी धर्मांतर केलेलं नाही. मी ख्रिश्चनच आहे.”

सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर अभिनेत्री म्हणाली, “सोशल मीडियावर फोटो पाहिल्यानंतर लोक त्यावर विचार न करताच मोठ्या प्रमाणात कमेंट्स करतात. बातम्यांमध्येदेखील धर्मांतर केलं असं म्हटलं गेलं. नेमकं काय प्रकरण आहे, हे तुम्ही आधी जाणून घ्या. तुम्हाला माझी पार्श्वभूमी माहीत नाही, माझ्याबद्दल माहीत नाही.”

जे लोक ट्रोल करतात, त्यांना स्पॉटलाइटमध्ये राहायचं असतं. हे लोक कमेंट बॉक्समध्ये माझ्याबद्दल चुकीचं लिहितात आणि मला मेसेज वेगळ्या प्रकारचे करतात. माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तुला भेटायचं आहे असे मेसेज करतात.

पुढे अभिनेत्री म्हणाली, “धर्म बदलणं ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. प्रत्येक व्यक्तीला तो अधिकार आहे. पण, लोकांनी त्यावर टीका करणं चुकीचं आहे. दुसरं मला असं वाटतं की जे लोक टीका करतात, त्यांच्या आयुष्यात खूप चिंता आहे, ही लोकं अपयशी लोक आहेत. त्यांच्या मनात खूप राग आहे. अशा लोकांना एक जागा मिळते ती सोशल मीडिया आहे. मग त्यांना अशा काही पोस्ट दिसल्या की मग त्यांचा अपयशीपणा, राग, द्वेष अशा सगळ्या गोष्टी मनात घेऊन ते कमेंट करतात.

“मला त्यांच्याबद्दल असं वाटतं की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रगती केली पाहिजे. पण, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल काहीही माहिती न घेता, उगाच दुसऱ्याला का टार्गेट करायचं? व्यक्त होण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण, कसं आणि कितपत बोललं पाहिजे, हे लोकांना समजलं पाहिजे; कारण तुम्ही योग्य भाषेतही सांगू शकता”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अभिनेत्रीने याच मुलाखतीत खुलासा केला की ती लवकरच नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress rajeshwari kharat breaks silence on conversion says i did not change my religion also talks about trolling nsp