मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांनी २८ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. साखरपुडा, संगीत, मेहेंदी, हळद आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पाहायला मिळाला. पूजा आणि सिद्धेशच्या लग्नसोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्न झाल्यानंतर दोघेही सिद्धिविनायकाच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी प्रभादेवीला गेले होते. आता हे नवविवाहित जोडपं एकत्र हनिमूनला जाण्यासाठी निघाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नाच्या सात दिवसांनंतर आता पूजा आणि सिद्धेश हनिमूनला जात आहेत. मुंबई विमानतळावर पूजा आणि सिद्धेशला सोडायला पूजाची बहीण रुचिरा आल्याचेही यात दिसतंय. नववधू पूजाने यात फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. हिरवा चुडा, मंगळसूत्र, मिनिमल मेकअप यात पूजाचं सौंदर्य खुलून दिसत आहे; तर सिद्धेशने तपकिरी टी-शर्ट, काळं जॅकेट, ग्रे जीन्स आणि सफेद शूज घालून त्याचा ‘एअरपोर्ट लूक’ पूर्ण केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पूजाची बहीण रुचिरा दोघांना सोडायला आली आहे. निरोप घेताना रुचिराने तिच्या भावोजींना मिठीदेखील मारली.

पूजा सावंतची बहीण रुचिरा ही तिच्या बहिणीच्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंत सगळीकडे आपली जबाबदारी पार पाडताना दिसली. आता विमानतळावरसुद्धा ती आपल्या लाडक्या बहिणीला आणि भावोजींना सोडायला आल्याचं दिसतंय. याबाबत रुचिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘आय मिस य़ू’ अशी स्टोरी शेअर केली आहे. त्या स्टोरीला पुन्हा शेअर करत पूजाने तिला ‘आय लव्ह यू’ म्हटलं आहे.

हेही वाचा… “तुला अभिनय येत नाही…”, नेटकऱ्यांच्या टीकेचा जान्हवी कपूरने असा केलेला सामना, म्हणाली…

दरम्यान, पूजा आणि सिद्धेश हनिमूनला जात असल्याचं म्हटलं जातयं. पूजाचा नवरा ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे, त्यामुळे दोघंही आता ऑस्ट्रेलियात जाणार आहेत किंवा दुसरीकडे कुठे? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja sawant siddhesh chavan spotted at mumbai airport going on honeymoon dvr