बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज वाढदिवस आहे. जान्हवीला आज (६ मार्च २०२४) २७ वर्षं पूर्ण झाली. २०१८ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धडक’ चित्रपटातून जान्हवीनं हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘गुंजन सक्सेना : द कारगिल वॉर’, ‘रुही’, ‘गुड लक जेरी’, ‘मिली’, ‘बवाल’ या चित्रपटांत जान्हवी झळकली. एका मुलाखतीत जान्हवीनं एक अभिनेत्री म्हणून टीकेला कसं सामोरं जावं लागतं याबद्दल खुलासा केला होता.

‘हार्पर्स बाजार इंडिया २०२३’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा जान्हवी टीकेला कसं सामोरं जाते, असं विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली होती, “काही काळ या इंडस्ट्रीत राहिल्यानंतर आणि जवळपास हजार मुलाखती दिल्यानंतर तुम्हाला गोष्टी कळू लागतात. लोक विशिष्ट पद्धतीनं का विचार करतात, क्लिकबेट हेडलाइन्सद्वारे प्रेक्षकांची मानसिकता कशी बदलली जाते, एखाद्या व्यक्तीबद्दल का बोललं जातं आणि त्यातलं नक्की कायं खरं व खोटं काय असतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. म्हणून जे बाहेर बोललं जात असतं, त्याचा मी स्वत:ला त्रास होऊ देत नाही. तुम्ही काहीही केलं तरी त्यात कोणाला ना कोणाला दोष सापडणारच.”

savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
kangana ranaut on rahul gandhi and sonia gandhi
‘राहुल गांधी आईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा’, ३ इडियट्स चित्रपटाचं उदाहरण देत कंगना रणौत म्हणाली…

पु़ढे जान्हवी म्हणाली, “जेव्हा आपण अथक परिश्रम करतो आणि सोशल मीडियावर जेव्हा एक अनोळखी व्यक्ती म्हणते, “तुला अभिनय नाही येत, तर का करतेस नेपो-किड?” तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं आणि मन दुखावलं जातं. पण जर कोणी असं म्हटलं, “तू ‘मिली’ चित्रपटात चांगलं काम केलंस; पण दुसऱ्या चित्रपटात तू अजून चांगलं काम करायला हवं होतंस.” तर मी अशा कमेंट्सचा नक्कीच आदर करीन. तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की, काही लोक दुसऱ्यांचा आनंद हिरावण्यातच स्वत:चा आनंद मानतात.”

हेही वाचा… डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीने शेअर केलेला अनंत अंबानींच्या प्री-वेडींगमधील फोटो पाहून भडकली अर्शद वारसीची पत्नी, म्हणाली…

दरम्यान, जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर, जान्हवी ‘देवरा पार्ट : १’ या आगामी चित्रपटात ज्युनियर एन.टी.आर.बरोबर झळकणार आहे. १० ऑक्टोबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर, १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘मिस्टर अॅंड मिसेस माही’ या चित्रपटातही जान्हवी दिसणार आहे.