२०१८ साली प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुफान गाजला. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात उद्योगांसाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांची विदारक कहाणी मांडण्यात आली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रवीण तरडे यांनी नुकतीच महाराष्ट्र किंग आणि क्विन कॉन्टेस्ट २०२३ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,
आणखी वाचा : Video: चाहत्याचा कहर! तयार केलं ‘बेशरम रंग’ गाण्याचं गझल व्हर्जन, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा : “२.३० तासात तू दोन महाराजांची…”, प्रवीण तरडे यांच्यासाठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट
मुळशी पॅटर्न चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटाची कथा, संवाद, गाणी, कलाकारांचा अभिनय हे सगळंच प्रेक्षकांना आवडलं. त्यामुळे आता प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा केल्याने या चित्रपटाबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत. मुळशी पॅटर्न 2 कधी प्रदर्शित होईल हेही लवकरच समोर येईल.
मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.