scorecardresearch

Video: चाहत्याचा कहर! तयार केलं ‘बेशरम रंग’ गाण्याचं गझल व्हर्जन, व्हिडीओ व्हायरल

हे गाणं ‘पठाण’ या चित्रपटाचा भाग नाही. फक्त आपली कल्पकता म्हणून त्याने हे गाणं तयार केलं आहे.

Video: चाहत्याचा कहर! तयार केलं ‘बेशरम रंग’ गाण्याचं गझल व्हर्जन, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरुन निर्माण झालेला वाद अजूनही सुरुच आहे. दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे या गाण्यावर आक्षेप घेतला जात आहे. इतकंच नव्हे तर अनेकांनी या गाण्याची चाल आणि ठेका आवडला नसल्याचंही सांगितलं. आता या गाण्याचं एक वेगळं व्हर्जन व्हायरल होत आहे.

‘बेशरम रंग’ हे गाणं प्रदर्शित होताच या गाण्यावर टीका होऊ लागली. हे गाणं अनेकांच्या पसंतीस पडलं नाही. आता अशातच या गाण्याचं गझल व्हर्जन व्हायरल होत आहे. कोलकाता येथे राहणाऱ्या सौम्य मुखर्जी याने हे गझल व्हर्जन तयार केलं आहे. हे गाणं ‘पठाण’ या चित्रपटाचा भाग नाही. फक्त आपली कल्पकता म्हणून त्याने हे गाणं तयार केलं आहे.

आणखी वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत भांडू लागली, व्हिडीओ व्हायरल

या व्हर्जनमध्ये त्याने या गाण्याला शांत संगीत देत पारंपरिक वाद्यांचा वापर केला आहे. “एक दिवस मी आणि माझा भाऊ बेशरम रंग’ हे गाणं ऐकत होतो तेव्हा आमच्या मनात या गाण्याचं गझल व्हरजन करण्याचा विचार आला,” असं त्याने हे नवीन व्हर्जन शेअर करताना लिहीलं. या गाण्याला यूट्यूबवर लाखो लाईक्स मिळाले आहे. तर अनेकांनी “ओरिजिनल गाण्यापेक्षा हे व्हर्जन चांगलं आहे” असं कमेंट्स करत सांगितलं आहे.

हेही वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकूनही ‘पठाण’चे पहिल्या दिवशीचे शो परदेशात हाऊसफुल, ‘या’ तारखेपासून भारतात सुरु होईल ॲडव्हान्स बुकिंग

‘बेशरम रंग’ हे गाणं दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. या मूळ गाण्याला विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केलं असून सुप्रसिद्ध गायिका शिल्पा राव हिने ते गायलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 18:29 IST

संबंधित बातम्या