लातूरमधील विलासराव सहकार कारखान्यात महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमात रितेश वडिलांच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रितेशचा व्हिडीओ शेअर करत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु, या सगळ्यात विलासरावांबद्दल टीकात्मक एक्स पोस्ट शेअर करणाऱ्या एका नेटकऱ्याला रितेशने जशास तसं उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश देशमुखने लातूरमधील कार्यक्रमात आपलं मत मांडताना “विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडणं त्यांच्या मनातही आलं नाही” असं म्हटलं होतं. अभिनेत्याच्या याच विधानावर एका युजरने एक्स पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : चैतन्यचा राजीनामा अन् अर्जुनचा संताप! सायलीचा ‘तो’ निर्णय ऐकून पूर्णा आजीचा राग अनावर, पाहा प्रोमो

“विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती आणि विधानपरिषद निवडणुकीत सेना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.” अशी एक्स पोस्ट एका युजरने केली आहे. यावर रितेशने “साफ खोटं! जा आणि आधी सत्य काय ते तपासून घ्या” असं जशास तसं उत्तर या नेटकऱ्याला दिलं आहे.

हेही वाचा : “माझ्याशी लग्न करशील का?” जेव्हा भर साखरपुड्यात पूजा सावंत होणाऱ्या नवऱ्याला करते प्रपोज…; पाहा खास व्हिडीओ

अभिनेत्याने दिलेल्या या उत्तरावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देत “अशा टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा रितेश दादा” असं म्हटलं आहे. दरम्यान, लातूरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात रितेश देशमुख वडिलांच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. साहेबांना जाऊन आता १२ वर्षे झाली हे सांगताना तो प्रचंड भावुक झाला होता. यावेळी त्याचे ज्येष्ठ बंधू आमदार अमित देशमुख यांनी रितेशला धीर दिला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh replies netizen who posted about late vilasrao deshmukh says this is untrue sva 00