लोकप्रिय लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या त्यांचा ‘सुभेदार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ‘श्री शिवराज अष्टक’ या त्यांच्या अनोख्या संकल्पनेतील त्यांचं पाचवं पुष्प ‘सुभेदार’ प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. गेले तीन आठवडे या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आता चौथ्या आठवड्यात चित्रपटाच पदार्पण झालं आहे. या चित्रपटाबाबत अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती; ज्यामधून त्यांनी ‘सुभेदार’ चित्रपट पाहण्याचे आवाहन केलं होतं. सुप्रिया सुळे यांनी चित्रपटाची दखल घेतल्यामुळे आता दिग्पाल लांजेकर यांनी त्याचे आभार मानले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “मराठी माणसाने पाय खेचण्याची वृत्ती सोडली पाहिजे”, कोकण हार्टेड गर्ल स्पष्टच बोलली; म्हणाली…

काही दिवसांपूर्वी ‘सुभेदार’ चित्रपटातील अभिनेते उत्कर्ष कुदळे हे सुप्रिया सुळेंच्या भेटीला गेले होते. या भेटीचा फोटो सुप्रिया सुळे यांनी शेअर करून सोशल मीडियावर लिहीलं होतं की, “आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उत्कर्ष मनोज कुदळे यांनी काल भेट घेतली. त्यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटामध्ये मराठा सरदार मावळाची भूमिका साकारली आहे. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या चित्रिकरणावेळीचे किस्से आणि प्रसंगांबद्दल सांगितलं. आपणही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नरवीर तानाजी मालुसरे आणि मावळ्यांच्या बलिदानाची आठवण करुन देणारा ‘सुभेदार’ हा चित्रपट नक्की पाहा. याप्रसंगी उत्कर्ष कुदळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.”

हेही वाचा – ‘ताली’ सीरिजला एक महिना पूर्ण, छोट्या गौरी सावंतनं सादर केली अप्रतिम कलाकृती, व्हिडीओनं वेधलं लक्ष

हेही वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने नाना पाटेकरांची घेतली भेट, अनुभव सांगत म्हणाली, “इतका साधेपणा…”

सुप्रिया सुळे यांच्या याच पोस्टचा फोटो दिग्पाल लांजेकर यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करून आभार मानले आहेत. दिग्पाल यांनी लिहीलं की, “सुप्रिया ताई…’फर्जंद’पासून मिळत असलेली तुमची शाब्बासकीची थाप अशीच कायम पाठीशी राहुदे…तुमचे आशीर्वाद खूप मोलाचे आहेत…असच पाठबळ आणि प्रेम आम्हा मावळ्यांबरोबर कायम असू दे… जय शिवराय..”

हेही वाचा – “आता धरती मातेचं काय होईल?” वजनावरून डिवचणाऱ्यांना विशाखा सुभेदारचं सडेतोड उत्तर म्हणाली, “आहे वजनदार पण…”

दरम्यान, दिग्पाल यांच्या ‘सुभेदार’ चित्रपटात मुख्य तानाजी मालुसरेंची भूमिका अभिनेता अजय पुरकरनं साकारली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत पुन्हा चिन्मय मांडलेकर पाहायला मिळत आहे; तर जिजाऊ आईसाहेबांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी झळकली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhedar movie director digpal lanjekar thanked ncp mp supriya sule pps