Premium

स्वप्नील जोशी पंचधातूचाच गणपती का बसवतो? कारण सांगत म्हणाला…..

स्वप्नीलच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. स्वप्नीलकडची बाप्पाची मूर्ती विशेष असते.

swapnil joshi
स्वप्नील जोशी पंचधातूचाच गणपती का बसवतो

अभिनेता स्वप्नील जोशी मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी त्याची ओळख आहे. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. त्याची मालिका ‘तू तेव्हा तशी’ प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तसेच तो चला हवा येऊ द्या कार्यक्रमात देखील उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत असतो. या कार्य्रक्रमात तो आपल्याला परीक्षकाच्या भूमिकेत दिसून येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “पहिल्यांदाच विमानाच्या केबिनमध्ये पाय ठेवला अन्…” अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला विमानातला अनुभव, म्हणाला…

दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच्याकडे बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पाला घरी आणतानाचा स्वप्नीलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वप्नीलच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. स्वप्नीलकडची बाप्पाची मूर्ती विशेष असते. स्वप्नील दरवर्षी गणपतीची पंचधातूची मूर्ती बसवतो. नुकत्याच एका मुलाखतीत स्वप्नीलने पंचधातूची मूर्ती का बसवतो यामागच कारण सांगितलं आहे.

स्वप्नील म्हणाला, “सुरुवातीला आम्ही मातीचा गणपती बसवायचो त्यानंतर शाडूचा गणपती बसवायला सुरुवात केली. एका वर्षी आम्ही गणपती विसर्जनासाठी गेलो होतो तेव्हा काही लोकांनी मला ओळखलं. मला भेटण्यासाठी लोकांची गर्दी जमली. त्या गर्दीत गपणतीला धक्का लागतो की काय असं वाटलं. गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही घरी आलो तेव्हा बाबा म्हणाले, लोक तुला भेटायला येतात त्यांना फोटो काढायचे असतात त्यांच तुझ्यावर प्रेम आहे. पण बाप्पाची मुर्ती हातात असताना आपण त्या धक्काबुक्कीचा चान्स घेऊ शकत नाही.”

स्वप्नील पुढे म्हणाला.” त्यानंतर बाबांनी विचार केला आपण गणपतीची पंचधातूची मूर्ती आणूत. बाप्पा ३६५ दिवस घरीपण राहतील आणि सुरक्षितताही सांभाळली जाईल. गेली ८ ते १० वर्ष आमच्याकडे गणपती बाप्पाची पंचधातूची मूर्ती आहे. त्याला आम्ही चांदीचं पॉलिश करतो. या पंचधातूच्या मूर्तीच प्रातिनिधीत स्वरुपात आगमन होतं आणि प्रातिनिधीक स्वरुपात विसर्जनही होतं. त्यानंतर ती मूर्ती धूऊन पूसून परत घरात ठेवली जाते.”

हेही वाचा- अभिनेता आदिनाथ कोठारेच्या लेकीनं बाप्पाला दिल्या हेल्थ टिप्स; पाहा व्हिडीओ

स्वप्नील जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच त्याचा ‘जिलबी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नितीन कांबळे सांभाळत आहेत. तसेच आनंद पंडीत यांच्याकडे या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी आहे. ‘जिलबी’ चित्रपटात स्वप्नील जोशीसह प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण पहिल्यांदाच हे त्रिकुट एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swapnil joshi revel why he install panchadhatu ganesha murti dpj

First published on: 21-09-2023 at 12:07 IST
Next Story
“पहिल्यांदाच विमानाच्या केबिनमध्ये पाय ठेवला अन्…” अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला विमानातला अनुभव, म्हणाला…