‘सुभेदार’ हा चित्रपट गेले अनेक महिने खूप चर्चेत आहे. दिग्पाल लांजेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला या चित्रपटातून मोठ्या पाडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर आता या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्पाल लांजेकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता हे विराजसने सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटातून पहिल्यांदाच मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी शिवानी रांगोळी हे तिघंही एकाच चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटामध्ये मृणाल कुलकर्णी जिजाबाईंच्या भूमिकेत, शिवानी यशोदाबाई मालुसरे यांच्या भूमिकेत, तर विराजस या चित्रपटामध्ये हेराच्या भूमिकेत दिसणार आहे. विराजस आणि दिग्पाल लांजेकर गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखतात. तर आता पहिल्यांदाच ते एकमेकांबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

आणखी वाचा : “विराजस, आता तरी…” लेकाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी त्याला दिला ‘हा’ खास सल्ला, पोस्ट चर्चेत

विराजसने नुकतंच इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेतलं. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले. तर एका चहा त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने दिग्पाल लांजेकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता हे सांगितलं. त्याने लिहिलं, “दादाबरोबर जवळजवळ वीस वर्ष काम करतोय… नाटक, अभिनय, ह्या क्षेत्रातला एकूणच प्रवास त्याच्यामुळे सुरू झाला. पहिल्यांदा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं तेव्हाही Chief Assistant Director तो होता. इतक्या वर्षांनी पुन्हा त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करणं, आणि तेही इतक्या महत्त्वाच्या चित्रपटासाठी…सोप्प्या शब्दात सांगायचं तर घरी आल्यासारखं वाटलं!”

हेही वाचा : “वर्षं पटापट निघून जातील आणि…” विराजस-शिवानीच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवानिमित्त मृणाल कुलकर्णींनी केलेली पोस्ट चर्चेत

दरम्यान, त्यांचा सुभेदार हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विराजस, शिवानी आणि मृणाल कुलकर्णी यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता या चित्रपटाबद्दल सर्वांच्याच मनात खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virajas kulkarni shares his experience of working with digpal lanjekar in subhedar film rnv