बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मीजान जाफरी हा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले पाय रोवायला सुरूवात करतोय. पण त्याआधीच तो त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आलाय. मीजान जाफरी हा त्याचा नुकताच रिलीज झालेल्या ‘हंगामा २’ चित्रपटामुळे चर्चेत आलाय. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकलाय.

अभिनेता मीजान जाफरी याच्या ‘हंगामा २’ मधील अभिनयासोबतच त्याच्या पर्सनल लाइफमुळे लाइमलाइटमध्ये आलाय. गेल्या काही दिवसापासून त्याचं नाव बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत जोडलं जातंय. हे दोघे कित्येकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसून आले आहेत. पण या दोघांपैकी कुणीही त्यांच्यातील डेटिंगच्या चर्चांवर स्पष्टपणे समोर येऊन बोलले नाहीत.

हे देखील वाचा: गौहर खानसोबत लग्न करताना पती जैदने ठेवली होती एक अट; अभिनेत्रीने केला आश्चर्यजनक खुलासा

नव्याबाबत सांगितली ही गोष्ट
आतापर्यंत अभिनेता मीजान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा या दोघांच्या रिलेशनशीपबाबत चर्चा होताना दिसून आल्या. पण मीजान याने नव्याच्या बाबतीत एक अशी गोष्ट शेअर केली की त्यावरून त्याच्या आयुष्यात नव्या नवेली नंदा किती महत्त्वाची आहे, हे दिसून आलं. मीजान सध्या आपल्या ‘हंगामा २’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जेव्हा त्याला नव्या नवेली नंदाबाबत विचारल्यानंतर, “नव्या नवेली नंदा त्याला खूपच आकर्षक वाटते” असं त्याने म्हटलंय.

पहा फोटो: काय आहे ‘बिग बॉस-१५’च्या नव्या घराची थीम; फोटो पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

यावेळी बोलताना अभिनेता मीजान म्हणाला, “नव्या ही माझी बहिण अलावियाची खूप जवळची मैत्रिण आहे. मला ती खूपच आकर्षक वाटते आणि माझ्या सगळ्या जवळच्या मित्र-मैत्रिणींपैकी ती एक आहे. हो खरंय की मुलींसोबत बोलत असतो म्हणून मला काही मुलींनी सोडून दिलं.” मीजानला त्याला कशी मुली आवडतात, असा प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला, “मला टोन्ड बॉडी असलेल्या मुली खूप आकर्षिक करतात.” तर दुसरीकडे मीजानची बहिण अलावियाने सुद्धा नव्याबाबत बोलताना सांगितलं की, “मीजान जर आपल्या मैत्रिणीला डेट करत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही”.

असिस्टंट डायरेक्ट म्हणून काम केलंय मीजानने
अभिनेता मीजानने यापूर्वी २०१८ साली रिलीज झालेल्या ‘पद्मावत’ चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत त्याने आपल्या करिअरची सुरूवात केलीय. त्यानंतर २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘मलाल’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून आपलं पाऊल टाकलं. पण या चित्रपटात त्याला हवं तसं यश मिळालं नाही.