अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने गेल्या काही वर्षात अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने केलेला संघर्ष सगळ्यांना आज प्रत्येकाला ठाऊक आहे. आजवर त्याने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या तो खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या आईने त्याच्या पत्नीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. यावर नवाझच्या पत्नीने अभिनेत्यावर आरोप केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं प्रकरण काय?

टीव्ही ९ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, आलिया नवाजुद्दीनच्या बंगल्यात गेल्यावर तिथे तिचा नवाजुद्दीनच्या आईबरोबर वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी आलियाला चौकशीसाठी बोलावले होते. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे वर्सोवा पोलिसांनी आलियाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिच्याविरुद्ध भादंवि कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भर कार्यक्रमात पत्रकाराने वरुण धवनला विचारला ‘तो’ खाजगी प्रश्न; अभिनेता म्हणाला, “आजच बायकोबरोबर…”

पत्नीने कोणते आरोप केलेत?

अभिनेत्याची पत्नी आलियाच्या वकिलाने असं म्हंटले आहे की’ नवाझ आणि त्याच्या कुटुंबीयांनी आलियाला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.’ मग तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी तिला अटक करण्याची धमकी दिली. याशिवाय वकिलांनी म्हंटले आहे की नवाझच्या कुटुंबीयांनी आलियाचा छळ केलं आहे. ते असं म्हणाले की नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबीयांनी गेल्या सात दिवसांपासून तिला जेवण दिलेले नाही. झोपायला बेड, अंघोळीसाठी बाथरूम वापरून देत नव्हते. आलियाच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेराही लावण्यात आला आहे. खोलीबाहेर २४ तास बॉडीगार्ड तैनात असतात. वकिलाचा आरोप आहे की “नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मी आलिया सिद्दीकीला भेटू नये यासाठी प्रयत्न केले, पण मी आणि माझ्या टीमने तिच्या सह्या मिळवण्यात यश मिळवले. आता आम्ही नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल करू शकणार आहोत.”

Video : “कोकण आणि ट्रेनचा प्रवास म्हणजे…” रुचिरा जाधवचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाचे लग्न २००९ मध्ये झाले होते. या दोघांना शोरा नावाची एक मुलगी असून यानी नावाचा एक मुलगा देखील आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui wife aaliya lawyer made serious allegations on actor spg